Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeCoronavirusअमिताभ बच्चन यांनी कोरोना लस टोचून घेतल्याचा फोटो खोटा, हे आहे सत्य

अमिताभ बच्चन यांनी कोरोना लस टोचून घेतल्याचा फोटो खोटा, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

अमिताभ बच्चन यांनी कोरोना लस टोचून घेतल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. व्यंग्यात्मक कमेंट्स करुन हा फोटो शेअर केला जात आहे. सोशल मीडियामध्ये व्हारल होत असलेल्या या फोटोवर लस घ्या पण कोरोनाची रिंगटोन बंद करा असा मजकूर लिहिलेला आढळत आहे.

https://www.facebook.com/photo?fbid=991657394692885

संग्रहित

https://www.facebook.com/photo/?fbid=2385394071595197
https://www.facebook.com/photo/?fbid=991657394692885

Fact Check / Verification

सरकारने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली असून 16 जानेवारीपासून सिरम इंस्टिट्यूटच्या, आणि भारत बायोटेकच्या लसीचे देशभरात सुरु झाले आहे. ही लस टोचून घेण्याबद्दल अनेक मतभेद आढळून आले, मात्र काही नेत्यांनी तसेच लोकांनी पुढाकार घेऊन ही लस टोचून घेतली. अशातच अमिताभ बच्चन यांचा लस टोचून घेत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या फोटो खाली लस घे पण रिंगटोन बंद करा असा व्यंग्यात्मक संदेश देखील लिहिण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांनी खरंच लस टोचून घेतली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला दैनिक जागरणची बातमी आढळून आली. यात अमिताभ यांना कोरना लसीमुळे पोलिओ लसीची आठवण आल्याचे म्हटले आहे. मात्र यात बातमीत कुठेही त्यांनी कोरोनाची लस टोचून घेतल्याचा फोटो किंवा उल्लेख नाही.

याशिवाय एनडीटिव्हीची बातमी आढळून आली. यात देखील अमिताभ यांनी कोरोना पोलिओ सारखा नष्ट व्हावा असे म्हटल्याचा उल्लेख आहे, मात्र त्यांनी लस टोचून घेतल्याचा उल्लेख नाही.

अमिताभ यांनी कोरोना लस टोचून घेतल्याची बातमी कोठेही न आढळल्याने आम्ही व्हायरल होत असलेल्या फोटोचा रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला एबीपी न्यूजची बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की बिहारमधील भाजपचे आमदार संजीव चौरसिया यांनी भारत बायटेकची कोरोनावरील लस टोचून घेतलयाचा फोटो आहे. आम्ही दोन्ही फोटोंची तुलना करुन पाहिली. चौरसिया यांना लस टोचणारे डाॅक्टर आणि अमिताभ यांच्या फोटोत दिसणारे डाॅक्टर सारखेच वाटत आहेत शिवाय चौरसिया आणि अमिताभ यांचा बनियान देखील एकाच संगाचा व आकाराचा दिसत आहे.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, बिहारमधील बीजेपीचे आमदार संजीव चौरसिया यांचा पोटो माॅर्फ करुन अमिताभ यांचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आला आहे.

Result – False

Our Sources

ABP- https://www.abplive.com/states/bihar/bjp-mla-sanjeev-chaurasiya-has-put-corona-vaccine-said-i-have-full-faith-in-scientists-ann-1710613

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular