Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: बॅलेट पेपर संदर्भात मोदी नेमके काय म्हणाले? जाणून घ्या सत्य...

Fact Check: बॅलेट पेपर संदर्भात मोदी नेमके काय म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
व्हायरल व्हिडिओत मोदीजी चुकून खरे बोलून गेले आहेत. ते म्हणतात जगातील अमेरिकासारखे शिकलेले देशही मतदानावेळी बॅलेट पेपरवर नाव वाचून त्यापुढे शिक्का मारतात.
Fact
हा दावा संदर्भ बदलून दिशाभूल करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधित वाक्य वेगळ्या अर्थाने बोललेले असून व्हिडिओचा अर्धा भाग दिशाभूल करीत व्हायरल करण्यात आला आहे.

बॅलेट पेपर संदर्भात मोदी नेमके काय म्हणाले असा प्रश्न उपस्थित करणारा आणि व्हायरल व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी चुकून खरे बोलून गेले आहेत, असे सांगणारा एक दावा सध्या केला जात आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत X खात्यावरून हा दावा केला आहे. साधारणपणे १४०० जणांनी ही पोस्ट रिट्विट केली असून ५००० युजर्सनी पोस्टला लाईक केले आहे तर त्यावर २३८ जणांनी कॉमेंट केल्याचे आमच्या निदर्शनास आले.

व्हिडीओ पोस्ट करताना “सूनो… ये महाशय गलतीसे सच बोल रहे है…@BJP4India @PMOIndia” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

या ट्विटचे संग्रहण येथे पाहता येईल.

बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकेवर मतदान व्हावे यासंदर्भात विरोधी पक्षांची मागणी आणि ईव्हीएम यंत्रांना विरोध यासंदर्भात सोशल मीडियावर प्रचंड मोठी चर्चा होताना दिसते. याचक्रमाने ही पोस्ट शेयर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षित देशातही बॅलेट पेपरवरच मतदान होते, हे कबुल केल्याचे सांगत हा दावा झाला आहे.

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही काही किवर्डच्या माध्यमातून X वर शोध घेतला. दरम्यान खासदार संजय राऊत यांच्या या ट्विटला उत्तर देणारे भाजपा महाराष्ट्र ने केलेले एक ट्विट आम्हाला सापडले.

“अर्धवटराव असले क्रॉप केलेले व्हिडिओ टाकून लोकांना “मूर्खमंत्री उबाठा” सारखे समजू नका. पुर्ण व्हिडिओ पाहा” अशी कॅप्शन आम्हाला वाचायला मिळाली. दरम्यान व्हायरल दाव्यात वापरण्यात आलेल्या व्हिडिओची दीर्घ आवृत्ती आम्हाला त्यामध्ये पाहायला मिळाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी “काही लोक म्हणतात, आमचा देश गरीब आहे. लोक अशिक्षित आहेत. लोकांना काही येत नाही. अरे जगातील शिक्षित देश सुद्धा जेंव्हा निवडणूक होते तेंव्हा बॅलेट पेपरवर नाव वाचून शिक्का मारतात आजही, अमेरिकेतसुद्धा. हा हिंदुस्थान आहे, ज्याला तुम्ही अशिक्षित म्हणता, गरीब म्हणता, तो बटन दाबून मतदान करणे जाणतोय. भारताच्या जनतेच्या शक्तीला कमी समजू नका. एकदा समजलं कि प्रामाणिकतेचा रस्ता हा आहे तेंव्हा माझ्या देशातील गरिबातील गरीबही चालू लागतोय.” असे बोलताना आढळतात.

यावरून व्हायरल दाव्यात मोदींच्या भाषणातील फक्त “अरे जगातील शिक्षित देश सुद्धा जेंव्हा निवडणूक होते तेंव्हा बॅलेट पेपरवर नाव वाचून शिक्का मारतात आजही, अमेरिकेतसुद्धा.” इतकाच भाग ठेऊन त्यापुढील आणि मागील भाग कापून टाकण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

संबंधित व्हिडिओकडे बारकाईने पाहिले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करीत असलेल्या पोडियमवर ‘परिवर्तन महारॅली’ असा उल्लेख असल्याचे आणि त्याखाली ३ डिसेंबर २०१६ अशी तारीख असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. यावरून सुगावा घेऊन शोध घेतला असता, Bharatiya Janata Party च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर ३ डिसेंबर २०१६ रोजी प्रसारित करण्यात आलेला ‘PM Modi’s Speech at Parivartan Rally in New Moradabad, Uttar Pradesh’ या शीर्षकाचा ४४ मिनिटे ३९ सेकंदाचा व्हिडीओ मिळाला. यामध्ये ३७ मिनिटांवर मोदींच्या भाषणाचा व्हायरल झालेला भाग पाहता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्युब चॅनेलवर देखील ३ डिसेंबर २०१६ रोजी उत्तरप्रदेश येथील मोरादाबाद येथे झालेल्या परिवर्तन रॅलीचा व्हिडीओ पाहता येईल. यामध्ये व्हायरल व्हिडिओमधील भाषणाचा भाग ५५ मिनिटानंतर पाहता येऊ शकतो.

देशात झालेल्या विकासावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षित देशात बॅलेट पेपरवर मतदान होत असताना आपला देश बटन दाबून मतदान करीत आहे अशा अर्थाने ते विधान केले असल्याचे आमच्या लक्षात आले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात जगातील अमेरिकासारखे शिकलेले देशही मतदानावेळी बॅलेट पेपरवर नाव वाचून त्यापुढे शिक्का मारतात असे विधान पंतप्रधान मोदींनी चुकून केले असून ते खरे बोलून गेले असल्याचा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: Missing Context

Our Sources
Tweet made by BJP Maharashtra on February 15, 2024
Video published by Bharatiya Janata Party on December 3, 2016
Video published by Narendra Modi on December 3, 2016


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular