Saturday, June 15, 2024
Saturday, June 15, 2024

HomeFact CheckNewsया शवपेट्या इटलीमध्ये कोरोना विषाणुच्या संक्रमणाने मृत्यू झालेल्या लोकांच्या नाहीत, वाचा सत्य

या शवपेट्या इटलीमध्ये कोरोना विषाणुच्या संक्रमणाने मृत्यू झालेल्या लोकांच्या नाहीत, वाचा सत्य

Claim

या शवपेट्या इटलीमध्ये कोरोना विषाणुच्या संक्रमणाने मृत्यू झालेल्यांच्या आहेत.

दाव्याचे संक्षिप्त विवरण
सोशल मीडियामध्ये कोरोना व्हायरसच्य संदर्भात अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. अशीच एक पोस्ट आम्हाला फेसबुकवर आढळून आली. या  पोस्टमध्ये शवपेट्यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, मृतदेहांनी भरलेले लष्करी ट्रक,शवगृहात पोचलेल्या शवपेट्या, हाताबाहेर चाललेली अनियंत्रित परिस्थिती पाहून विषण्ण झालेले डॉक्टर, जगातील सर्वोत्तम दुसऱ्या स्थानावर वैद्यकीय सेवा असलेल्या इटली मधील हे छायाचित्र आहे.
Verification
आम्ही याबाबत शोध सुरु केला असता फेसबुकवर इंग्रजीमध्ये एक पोस्ट आढळून आली यात फोटो वेगळा होता मात्र हा फोटो इटलीतील कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने मृत पावलेल्या लोकांच्या शवपेट्या असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
आम्ही गूगलमध्ये इटलीत कोरोना विषाणूची नेमकी काय परिस्थिती आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अल जजीरा वेबसाईटवर एक बातमी आढळून आली यात म्हटले आहे की इटलीमध्ये दिवसेंदिवस कोरोना संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे. एका दिवसात 743 मृत्यू झाले आहेत.
मात्र आम्हाला या बातमीमध्ये किंवा अन्य मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये व्हायरल शवपेट्यांचे फोटो आढळले नाहीत. त्यामुळे आम्ही या फोटोचा पडताळणीसाठी गूगल रिव्हर्स इमेजचा आधार घेतला. या शोधा दरम्यान आम्हा दी गार्डियन या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर पहिल्या पोस्टमधील फोटो आढळून आला. ही बातमी 6 वर्षे जुनी आहे. या बातमीनुसार हा फोटो इटलीमध्ये मृत झालेल्या शेकडो स्थलांतरीत लोकांच्या आहेत. यामध्ये एक गर्भवती महिलेचा देखील समावेश आहे.
दुस-या फोटोबद्दल देखील गेट्टी इमेजवर माहिती मिळाली. हा फोटो देखील त्याच दरम्यानचा आहे. यात म्हटले आहे की, इटलीच्या किना-यावर  जहाज दुर्घटनेत मृत पावलेल्या अफ्रिकन स्थलांतरीतांच्या शवपेट्या लॅम्पेडुसा विमानतळावर ठेवण्यात आल्या होत्या. मृत्यूचा आकडा 300 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की हे फोटो इटलीमधील कोरोना व्हायरसने मृत पावलेल्या लोकांच्या शवपेटयांचे नाहीत तर सात वर्षापूर्वी जहाज दुर्घटनेत मृत पावलेल्या अफ्रिकन स्थलांतरितांच्या शवपेट्यांचे आहेत. सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल झाला आहे.
Source
Facebook Search
Google Reverse image
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular