Thursday, July 18, 2024
Thursday, July 18, 2024

HomeFact CheckViralमुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिपब्लिक न्यूज चॅनल पाहत असल्याचा फोटो खोटा, जाणून घ्या...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिपब्लिक न्यूज चॅनल पाहत असल्याचा फोटो खोटा, जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिपब्लिक न्यूज चॅनल पाहत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. उपहासात्मक पोस्टमध्ये म्हटले आहेकी, अर्णव गोस्वामीकडून 500 रुपये घेऊन रिपब्लिक न्यूज पाहत असलेला भारतीय गरीब.

मुंबईचे पोलिस आयुक्त परबमबीर सिंह यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रिपब्लिक न्यूज सह इतर दोन चॅनल्सनी टीआरपी वाढविण्यासाठी ज्या घरात बॅरामीटर बसविले तेथील लोकांना दिवसाला 400 ते 500 रुपये देऊन ठराविक चॅनेल्स पाहण्यास उद्युक्त केले. विशेष म्हणजे झोपडपट्टीमध्ये इंग्रजी येत नसलेल्या घरात देखील इंग्रजी चॅनेल्स सुरु ठेवले जात होते अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. मुंबई पोलिस चॅनल विरोधात कारवाई करणार असल्याचे माहिती दिली आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अर्णब गोस्वामी यांचा रिपब्लिक न्यूज चॅनल पाहत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/YogiDevnath2/status/1314406519257985025

संग्रहित

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=382017966503212&id=100040850363883

संग्रहित

संग्रहित

Fact Check / Verification

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरंच रिपब्लिक न्यूज चॅनल पाहत होते का याची पडताळणी सुरु केली, यासाठी गूगल रिव्हर्स इमेजच्या आधारे शोध घेतला असता या फोटोचे अनेक परिणाम दिसून आले. या शोधादरम्यान आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाचे 27 एप्रिल 2020 रोजीचे ट्विट आढळून आले ज्यात मुख्यमंत्र्याच असाच फोटो आहे. मात्र टिव्हीच्या स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दिसत आहेत. ट्विटमध्ये म्हटले आहे की, माननीय पंतप्रधानांसमवेत चालू असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसेच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी कोरोनाशी लढाईविषयी चर्चा करताना गृहमंत्री अमित शहा.

संग्रहित

अधिक शोध घेतला असता आम्हाला मुंबई लाईव्ह या वेबसाईटवर 27 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ काॅन्फरन्स द्वारे चर्चा करता दिसत आहेत बातमीत 3 मे नंतर लाॅकडाऊन उठवण्यासारखी परिस्थिती देशात नसल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नोंदवलं असल्याचं म्हटलं आहे.

आम्ही सोशल मीडियात व्हायरल होत असलेला फोटो आणि मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केलेल्या फोटोची तुलना करुन पाहिली असता पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ काॅन्फरन्सचा फोटो एडिट केल्याचे आढळून आले.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोनासंदर्भात चर्चेच्या व्हिडिओ काॅन्फरन्सचा फोटो एडिट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिपब्लिक न्यूज चॅनेल पाहत असल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे.

Result- Manipulated Media

Our Sources

CMO Maharashtra- https://twitter.com/CMOMaharashtra/status/1254664425358766081

Mumbai Live- https://www.mumbailive.com/mr/politics/coronavirus-live-updates-pm-narendra-modi-talk-with-cm-uddhav-thackeray-over-coronavirus-and-lockdown-48749

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular