Monday, October 25, 2021
Monday, October 25, 2021
घरFact Checksकास पठाराचा नाही हा व्हायरल फोटो, जाणून घ्या सत्य

कास पठाराचा नाही हा व्हायरल फोटो, जाणून घ्या सत्य

लाॅकडाऊनमुळे हौशी पर्यटकांचा वावर नसल्याने कास पठार चहुअंगानी फुलले आहे.

सोशल मीडियात रंगबिरंगी फुलांनी बहरलेल्या पठाराचा एक फोटो व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की, हा फोटो कास पठाराचा आहे. यंदा लाॅकडाऊनमुळे हौशी पर्यटकांची वर्दळ नसल्याने पठार अशा प्रकारच्या फुलांनी चहुअंगानी फुलले आहे. आमच्या एका वाचकाने आम्हाला हा फोटो पाठवला आणि याबाबतची सत्यता पडताळण्यास सांगितले.

पडताळणी

व्हायरल फोटो कास पठारावर फुललेल्या रंगबिरंगी फुलांचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गूगलमध्ये काही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता जुन्या बातम्या आढळून आल्या मात्र जून किंवा जुलै2020 मधील बातमी आढळून आली नाही.

मात्र या बातम्यामंध्ये व्हायरल फोटोतील दृश्य देखील आढळून आले नाही. अधिक माहिती करता आम्ही कास पठाराच्या वेबसाईटला भेट दिली. मात्र वेबसाईटवर देखील कास पठार फुलल्याची माहिती दिलेली नाही. यानंतर आम्ही कास पठार समितीचे सदस्य मारुती चिकणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या पठारावार एक दोन प्रकारची फुलले उमलली असल्याची माहिती दिली, आम्ही त्यांना व्हायरल फोटोविषयी विचारले असता त्यांनी हा फोटो कास पठाराचा नसल्याचे सांगितले पठाराचे. चिकणे यांनी 6 जुलै 2020 रोजी काढलेले काही फोटो देखील शेअर केले. या फोटोत रिमझिम पावसामुळे पठारावर हिरवळ फुलल्याचे दिसत आहे.

अधिक माहिती घेण्याकरिता आम्ही वनक्षेत्रपाल मेढा कार्यालयात संपर्क साधला असता तेथे देखील आम्हाला हा फोटो कास पठाराचा नसल्याची माहिती मिळाली. तसेच जावली तालुका वनाधिकारी श्री परदेशी साहेब यांनी देखील हा फोटो कास पठाराचा नाही अशी माहिती दिल्याचे वनविभागातील कर्मचा-यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार कास पठार अशा रंगाच्या फुलांनी फुलल्याचे कधीही पाहिलेले नाही.

व्हायरल फोटो नेमका कुठला आहे ?

आम्ही व्हायरल फोटो नेमका कुठला आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता https://www.tumblr.com/explore/trending या वेबसाईटवर आढळून आला. एका इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो या वेबसाईटवर घेण्यात आलेला आहे. https://www.instagram.com/astrailor_jp/ या अकाउंटवर हा फोटो कूजू फुलाच्या उद्यानाचा असल्याचा उलेलेख आढळला. हा फोटो 28 मे रोजी अपलोड करण्यात आलेला आहे.

https://www.instagram.com/p/CAurWk8JQMM/

हे उद्यान नेमके कुठे आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते जपानमध्ये असल्याचे आढळून आले. ट्रिप अडवायझर या वेबसाईटवर देखील जपानमधील या राष्ट्रीय उद्यानाची माहिती मिळते.

यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल फोटो जपानमधील राष्ट्रीय उद्यानातील आहे. सोशल मीडियात हा फोटो कास पठाराचा नावाने शेअर केला जात आहे.

Source

  • Whatsapp
  • Google Reverse Image
  • Direct contact

Result- Misleading

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular