Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeCoronavirusकोरोना तिस-या टप्प्यासंदर्भात पुणे जिल्हाधिका-यांच्या नावाने संदेश व्हायरल, हे आहे सत्य

कोरोना तिस-या टप्प्यासंदर्भात पुणे जिल्हाधिका-यांच्या नावाने संदेश व्हायरल, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

कोरोनाचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे, यादरम्यान अतिदक्षता बाळगण्याबाबत पुण्याच्या जिल्हाधिका-यांच्या नावाने काही सुचनांचे पालन करण्याबाबत संदेश व्हायरल झाला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आला आहे. याचदरम्यान पुणे जिल्हाधिकारीका-यांच्या नावाने एक संदेश व्हायरल झाला असून, यात म्हटले आहे की कोरोनाचा तिसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे या दरम्यान अतिदक्षता बाळगावी लागेल यासाठी काही सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. चिकन-मटन खाणे बंद, शेजा-यांशी संबंध ठेवू नये, भेटीगाठी बंद, इतरांसोबत फिरणे बंद, बेकरीचे पदार्थ बंद, झोमॅटो स्विगी बंद करा इत्यादी 17 सुचना या संदेशात केलेल्या आहेत.

पडताळणी

पुणे जिल्हाधिका-यांच्या नावाने व्हायरल होत असलेला संदेश फेसबुक आणि व्हाट्सएप्प या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आम्हाला आढळून आले.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=904169020059339&id=100013987474630

संग्रहित

संग्रहित

https://www.facebook.com/manojpatilbjp/posts/755043295265901

संग्रहित

व्हाट्सअॅप्प वर देखील हा संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आम्ही व्हायरल मॅसेजसंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता महाराष्ट्र टाईम्सची 1 जुलै रोजीची बातमी आढळून आली. या बातमीत म्हटले आहे की,

सोशल मीडियावर पसरविण्यात येणाऱ्या या संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या संदेशामध्ये घरकामगारांना जमल्यास पगारी सुट्टी द्या, कुरिअर बंद करा, पुढील २० दिवसांसाठी किराणा माल भरून ठेवा, अशा प्रकारची खोटी माहिती पसविण्यात येत आहे. याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.हा संदेश खोटा असून, त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. हा संदेश कोणीही पुढे पाठवू नये अन्यथा संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राम यांनी दिला आहे. शहरासह जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन लागू केले जाणार नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

याशिवाय जिल्हा माहिती कार्यालयाने देखील याबाबत फेसबुकवर स्पष्टीकरण दिलेले आहे.

https://www.facebook.com/1429920543980795/posts/2335340240105483/

यावरुन हेच स्पष्ट होते की, पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी कोरोनाच्या तिस-या टप्प्याबाबत सुचनांचे पालन करण्याबाबत संदेश दिलेला नाही. जिल्हाधिका-यांच्या नावाने व्हायरल होत असलेला संदेश खोटा आहे.

Source

  • Facebook
  • Whatsapp
  • Google

Result- False

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular