Monday, October 25, 2021
Monday, October 25, 2021
घरFact ChecksViralभावनगर ते भरुच क्रुझ सेवा सुरु झालेली नाही, जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे...

भावनगर ते भरुच क्रुझ सेवा सुरु झालेली नाही, जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

गुजरातमध्ये भावनगर ते भरुच क्रुझ सेवा सुरु झाली असल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये म्हटले आहे की,

भावनगर ते भरुच रोड हे अंतर 350 किलोमीटर आहे, आणि समुद्री मार्गाने ते 32 किलोमीटर आहे आता या समुद्री मार्गाने जहाज सेवा सुरू करण्यात आली आहे . जहाजाची क्षमता 50 ट्रक, 60 बसेस, 200 कार, 350 मोटारसायकली, एका वेळी 600 लोक आणि अवघ्या अर्ध्या तासात ..केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब महाराष्ट्राचा अभिमान आहे म्हणून सांगावसं वाटतं दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा…

फेसबुक/ संग्रहित

Fact Check/Verification

व्हायरल व्हिडिओ भावनगर ते भरुच क्रुझ सेवेचा आहे का याची पडताळणी सुरु केली. या व्हिडिओतील एक स्क्रीनशाॅट घेतला आणि रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता usatoday.com या वेबसाईटवर 14 आॅक्टोबर 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत हा व्हिडिओ आढळून आला. बातमीत म्हटले आहे की ग्रीक मधील केवळ पाच फुट रुंद कॅनालमधून क्रुझ जात आहे.

याशिवाय 17 आॅक्टोबर 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या nypost.com च्या बातमीत देखील हाच उल्लेख करण्यात आला आहे.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, भावनगर- भरुच क्रुझसेवेचा हा व्हिडिओ नसून ग्रीकमधील आहे. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Result- Misleading

Sources

USA TODAY- https://www.usatoday.com/story/travel/cruises/2019/10/14/cruise-ship-passes-through-greek-canal-5-feet-breathing-room/3973369002/

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular