Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeFact CheckViralहाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचा नाही व्हायरल होत असलेला तो फोटो, हे आहे...

हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचा नाही व्हायरल होत असलेला तो फोटो, हे आहे सत्य

Authors

हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दावा करण्यात फोटो दिसणारी मुलगी ही हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडिता आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथी एका 19 वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यासोबत नृशंस कृत्य केले गेले. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर यूपी पोलिसांनी अर्ध्या रात्री तिचा अंत्यसंस्कार केला. या प्रकरणानंतर संतापाची लाट उसळली आहे.

संग्रहित

Fact Check / Verification

व्हायरल होत असलेला फोटो हाथरस बलात्कारा प्रकरणातील पीडितेचा आहे का याची पडताळणी सुरु केली. गूगलमध्ये काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता हा फोटो अनेक पोस्टमध्ये आढळून आला. मात्र हा फोटो पीडितेचा नसल्याची एक पोस्ट आढळून आली, ज्यात पोस्टकर्त्याने म्हटले आहे की, व्हायरल फोटो माझ्या मित्राच्या बहिणीचा आहे ती अयोध्येतील असून तिचा मागील वर्षी तिचा हाॅस्पिटलच्या हलर्गीपणामुळे चंदिगडमध्ये मृत्यू झाला. आता हा फोटो हाथरसच्या घटनेचा म्हणून शेअर होतो आहे. दुर्देवाने दोन्ही पीडितांचे नाव एकच आहे.

संग्रहित

अधिक शोध घेतल्यावर अजय जितू यादव नामक व्यक्तीची 29 सप्टेंबर रोजी पोस्ट आढळून आली, ज्यात त्याने म्हटले आहे की, सोशल मीडियावर हाथरस बलात्कार पीडितेचा म्हणून जो फोटो शेयर होत आहे तो चुकीचा आहे. माझ्या बहिणाचा 2018 चंदिगड येथील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी तिच्या फोटोसह एक मोहीम चालविली होती. परंतु, आता तो फोटो हाथरस प्रकरणाशी जोडून शेयर केला जात आहे. कृपया कोणीही तो शेअर करु नका.

फेसबुक/संग्रहित

अजय यादव यांनी आपल्या बहिणीच्या अंत्यसंस्काराचे फोटो देखील शेअर केले होते..

फेसबुक/ संग्रहित

India Today ने देखील हाथरस पीडितेच्या कुंटुंबियांशी संपर्क केला असता त्यांनी व्हायरल फोटो पीडितेचा नसल्याचे सांगितले.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की सोशल मीडियात व्हायरल होत असलेला फोटो हाथरस प्रकरणातील पिडितेचा नसून , दोन वर्षापूर्वी मृत पावलेल्या मुलीचा आहे. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल होत आहे.

Result:Misleading

Our Sources

फेसबुक- https://www.facebook.com/ajayyadav.jeetu/posts/1512023675568952

इंडिया टुुडे- https://www.indiatoday.in/fact-check/story/wrong-girl-goes-viral-on-social-media-as-hathras-victim-1726722-2020-09-29

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular