Friday, June 25, 2021
Friday, June 25, 2021
घरFact ChecksViralसध्याच्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही मशिदीत नमाज पठण करणा-या शीख तरुणाचा फोटो

सध्याच्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही मशिदीत नमाज पठण करणा-या शीख तरुणाचा फोटो

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित अनेक दावे व्हायरल होत आहे. असाच एक दावा सोशल मीडियात शेअर होत आहे. यात एका मशिदीत मुस्लिम बांधवांसोबत शीख युवक नमाज पठण करतानाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. दावा करण्यात येत आहे की, हा युवक शेतकरी आंदोलनात सहभागी झालाव नंतर त्याने मशिदीत नमाज पठण केले मात्र तो या दरम्यान आपली पगडी काढून ठेवायला विसरला.

फेसबुक/ संग्रहित

https://www.facebook.com/photo?fbid=813662315879600

Fact Check / Verification

व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही तपास सुरू केला. तपासादरम्यान, गुगलवर रिव्हर्स इमेज टूलद्वारे व्हायरल फोटोचा शोध घेण्यास सुरवात झाली. त्यानंतर आम्हाला गुगलवर एक फेसबुक पोस्ट आढळून आली. या फेसबुक पोस्टमध्ये व्हायरल फोटो आढळून आला.

पोस्टमधील फोटो 30 जानेवारी रोजी अपलोड केल्याचा उल्लेख असल्याने आम्हाला हा फोटो जुना असल्याची शंका वाटली या फोटोच्या अचूक माहितीसाठी शेख मोहम्मद असलम नावाच्या यूजरच्या प्रोफाइलवर फोटोचा शोध सुरू केला. यानंतरआम्हाला आढळून आले की याच यूजरने 30 जानेवारी रोजी फेसबुकवर अपलोड केला होता.

यानंतर आम्हाला 31 जानेवारी 2016 रोजीच्या फेसबुक पोस्टमध्ये हा फोटो आढळून आला. यात म्हटले आहे की एका शीख युवकाने मशिदीत नमाज पठण केले होते. तो शीख युवक मशिदीत आला त्याने अल्लाह हू अकबर असे म्हटले आणि हा सुंदर धर्म जगभर पसरू दे असेही तो म्हणाला, असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, मशिदीत शीख युवक नमाज पठण करत असलेला फोटो सध्याच्या शेतकरी आंदोलनादरम्यानचा नसून पाच वर्षांपूर्वीचा आहे.

Result -Misleading

Our Sources

फेसबुक- https://www.facebook.com/ShaykhAslam/photos/basw.AbqWpsHXzkzED7DxI0ZlD7kz6_adKX3-QpL-IjYxREcdCXnwFsu6HRTNh-

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular