Wednesday, October 16, 2024
Wednesday, October 16, 2024

HomeFact CheckCrimeइंटरनेट साक्षरतेत अग्रेसर महाराष्ट्रात सायबर क्राईमचे संकट

इंटरनेट साक्षरतेत अग्रेसर महाराष्ट्रात सायबर क्राईमचे संकट

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सध्या आपल्या दैनंदिन जीवनात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. इंटरनेट वापराच्या काही चांगल्या बाबी आहेत पण काही दृष्प्रवृत्तीद्वारे याचा दुुरुपयोग होत असल्याने आॅनलाइन म्हणजेच सायबर क्राईम मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आभासी जगातील या गुन्हेगारीचा फटका सामान्य लोकांबरोबरच अनेक वेळा सरकारला देखील बसललेला आहे. आपण या लेखात इंटरनेट साक्षरतेत पुढे असलेल्या महाराष्ट्रात सायबर क्राईमची काय परिस्थिती आहे हे मागील 6 वर्षांच्या आकडेवारीवरुन पाहणार आहोत. 
 
डिजीटल साक्षरतेते महाराष्ट्र पुढे आहे हे गेल्यावर्षी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून समोर आले आहे. मात्र राज्यात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईमची प्रकरणे देखील समोर येत आहेत. साल 2012 च्या तुलनेत 2013 मध्ये यामध्ये मोठी वाढ झाली होती हे देखील एका अहवालातून समोर आले होते. 
 
या अहवालानुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आयटी अॅक्ट आणि आयपीसी अॅक्ट अंतर्गत सायबर गुन्हे दाखल झाल्याची संख्या निश्चितच जास्त होती. Factly या वेबसाईटच्या अहवालानुसार 2011 ते 2015 या कालावधीत महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आलेली आहे.  या पाच वर्षात महाराष्ट्रात 5900 सायबर क्राईमची प्रकरणे घडली त्यानंतर उत्तर प्रदेशमध्या 5000 प्रकरणे घडली, कर्नाटक राज्य तिस-या क्रमांकावर आहे तिथे 3500 हून अधिक प्रकरणे उघडकीस आली. या तीन राज्यामंध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. 
 
नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार साल 2015 मध्ये महाराष्ट्रात 2195 सायबर गुन्हे घडले मात्र त्या वर्षी महारा्ष्ट्रातील या गुन्ह्यांचा दुसरा क्रमांक होता. उत्तरर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त 2208 गुन्हे घडले होते.  
 
मात्र यानंतरही राज्यात सायबर गुन्हे कमी झालेले नाहीत या उलट गुन्ह्यांत वाढ झालेली वेगवेगळ्या अहवालावरुन दिसून येते. हिंदुस्तान टाईम्समध्ये साल 2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत महाराष्ट्रात एका वर्षात 41 % सायबर गुन्हे वाढल्याचे म्हटले आहे. 
 
एवढया मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांत वाढ होत असली तरी तपास मात्र खूपच कमी प्रमाणात होत असल्याचे आढळून आले. मात्र गुन्ह्यांत दरवर्षी वाढ होतच आहे. DNA च्या एका बातमीत राज्यातील सायबर क्राईम आणि त्याचा तपास याची माहिती देण्यात आली आहे. 
 
मोबाईलवर इंटरनेट वापरणा-यांची संख्या देखील झपाट्याने वाढत असताना सायबर क्राईम देखील तितक्याच झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे, साल 2019 मध्ये हा आकडा आणखीच वाढल्याने ही समस्या किती गंभीर आहे हे फ्री प्रेस च्या बातमीवरुन लक्षात येईल. मागील वर्षी फक्त 10 महिन्यांत 2800 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. म्हणजेच दिवसाला 10 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. 
 
Sources 
 
  • National Crime Bureau
  • Hindustan Times
  • DNA
  • Free press journal
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular