Friday, October 7, 2022
Friday, October 7, 2022

घरMarathiउत्तरप्रदेशात दहा हजार मुस्लिमांविरुद्ध दाखल झाला नाही एफआयआर, व्हायरल झाला खोटा दावा

उत्तरप्रदेशात दहा हजार मुस्लिमांविरुद्ध दाखल झाला नाही एफआयआर, व्हायरल झाला खोटा दावा

Claim–  

उत्तर प्रदेशात दहा हजार मुस्लिमांविरुद्ध एफआयआर दाखल तर 650 लोकांना अटक केली आहे. 47 लोकांची संपत्ती देखील सील करण्यात आली आहे. 
 
Verification- 
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात उत्तर प्रदेश, दिल्ली आणि बिहारसह देशभरात हिंसक निदर्शने झाली. दोन दिवस चाललेल्या या हिंसाचारात बर्‍याच लोकांचा मृत्यूही झाला, त्यानंतर यूपी पोलिसांनी कारवाई सुरु केली. यूपीमध्ये झालेल्या हिंसक निषेधानंतर सोशल मीडियावर एक आकडा शेअर केला जात आहे. व्हायरल आकडेवारीत असा दावा केला जात आहे की उत्तर प्रदेशातील १०,००० मुस्लिमांविरोधात एफआयआर नोंदविला गेला आणि 650 लोकांना अटकही करण्यात आली. हेच दावे अनेक फेसबुक आणि ट्विटर यूजर्सनी केले आहेत. 
 
 
काही कीवर्डच्या मदतीने आम्ही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डेटाची तपासणी केली. तपासणी दरम्यान आम्हाला अमर उजाला आणि आशियानेटच्या वृत्तांचें लेख सापडला. हे लेख वाचल्यानंतर आम्हाला कळले की उत्तर प्रदेश, दिल्ली आणि बिहारसह अनेक देशांमध्ये सीएएविरूद्ध हिंसाचाराची आग भडकली आहे. परंतु यूपीमधील रामपूर, कानपूर आणि मुझफ्फरनगरमध्ये सर्वाधिक आहे. रामपूरमध्ये हिंसक आंदोलनादरम्यान एका युवकाचा मृत्यू झाला. त्याचवेळी सीएएविरोधात आंदोलन करणा-यांवर कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी 10,000 लोकांविरूद्ध एफआयआरही दाखल केला आहे. उत्तर प्रदेशात हिंसाचाराच्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
 
 
 
आमच्या तपासणीत आढळले की यूपीमध्ये 10 हजार मुस्लिमांविरुद्ध एफआयआर दाखल झालेला नाही तर एकूण एफआयआर दाखल झालेल्या लोकांचा हा आकडा आहे. सोशल मीडियात हा आकडा चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल होत आहे.
 
Tools Used:

Google Keywords Search 

Result: False 

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular