Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Marathi
महाराष्ट्रात सध्या जी काही राजकीय उलथापालथ सुरू आहे ती एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. सकाळी वर्तमानपत्रात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याच्या बातम्या वाचायला मिळाल्या तर टिव्ही लावला तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या बातम्या झळकल्या. शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शुक्रवार रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत होते मात्र एक रात्रीत अशी कोणती उलथापालथ झाली ज्यामुळे शनिवारी सकाळी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या शपथविधीची बातमी आली.
पिछले एक महीने में महाराष्ट्र में सरकार बनाने को लेकर कई समीकरण बनें और बिगड़े, क्या था पूरा घटनाक्रम?
24 ऑक्टोबर
महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी विधानसभांच्या 288 जांगासाठी मतदान झाले. याचा निकाल 24 आॅक्टोबर रोजी लागला आणि यात भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळाले. भाजपचे एकूण 105 तर शिवसेनेचे 56 उमेदवार निवडून आले तर काॅंग्रेसचे 44 जागांवर उमेदवार निवडले गेले तर राष्ट्रवादी काॅंग्रेसनेदेखील 54चा आकडा गाठला. यावरुन युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपा शिवसेेनेचे सरकार पुन्हा येणार असल्याचे निश्चित झाले.
29 ऑक्टोबर
भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्ता पदांचे समसमान वाटप यावरुन वाकयुद्ध सुरु झाले शिवसेनेने 50 टक्के सत्तेत वाटा आणि अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पदावर दावा केला। याबाबत भाजपाने आपला शब्द पाळावा असेही सुचवले. मात्र भाजपने सांगितले की मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही इतर पदांबाबत वाटपाची चर्चा होईल.
8 नोव्हेंबर
शिवसेनेने भाजपवर विश्वासघात केल्याचा आरोप लावला. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपने आपला शब्द पाळलेला नाही, सरकार 50-50 च्या फाॅर्म्युल्यावर चालेल आणि शिवेसनेला मुख्यमंत्री पद मिळेल असे दोन्ही पक्षांच्या बैठकीत ठरले होते. पण भाजपने अशा प्रकारच्या दाव्याचा नकार दिला.
10 नोव्हेंबर
राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर भाजपने शिवसेना सोबत नसल्याने बहुमताचा आकडा न गाठता आल्यामुळे सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले.
शिवसेने सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार आणि काॅंग्र अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली.
कोणताच पक्ष बहुमत सिद्ध करु न शकल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपति राजवट लागू केली.
वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस हे तिन्ही पक्ष महाराष्ट्राला स्थिर सरकार देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कॆली.
6 PM– शिवसेना-NCP- आणि कांग्रेसने सरकार स्थापन करण्याचा व सत्तावाटपाचा फाॅर्म्युला तयार केला शिवाय मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब देखील केले. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांचा मोबाईल रात्री नऊ नंतर नाॅ रिचेबल येऊ लागला.
11:05 PM– देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींची चर्चा करुन अजित पवार आणि भाजपा यांच्यात झालेल्या डिलचा खुलासा होण्याआधी शपथविधी पार पाडण्याचा आग्रह केला.
11:45 PM– भाजपचे नेते आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली.
12:30 AM– राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्ली दौरा रद्द केला.
5:30 AM– देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात पोहचले पहुंचे।
5:47 AM– महाराष्ट्र राष्ट्रपित राजवट रद्द केली गेली नंतर याची घोषणा सकाळी 9 वाजता करण्यात आली.
8 AM– देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
पर काही क्षणांत सोशल मिडियात ही बातमी व्हायरल झाली मात्र लोकांना ती फेक न्यूज वाटली मात्र जेव्हा टिव्हीवर शपथविधीची दृश्ये दिसू लागली तेव्हा मात्र एकच गोंधळ उडाला. राष्ट्रवादीतून अजित पवारांचा गट फुटल्याचे उघड झाले.
12:30 PM- शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यात पवार यांनी सांगितले की अजित पवार यांनी विश्वासघात केला असून पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार आहे. तसेच भाजपबहुमत सिद्ध करु शकणार नाही असेही सांगितले. तर उद्धव ठाकरे म्हणाले भाजपने महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राईक केला असून स्वाभिमानी महाराष्ट्र याचे उत्तर नक्कीच देईन.
राज्यपालांनी भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. भाजप बहुमत सिद्ध करु शकेल का तसेच राजकारणातील चाणक्य समझले जाणारे शरद पवार नक्की काय खेळी करतील, राज्याच्या राजकारणात परत एकदा भाजपाचे सरकार येईल की आणखी काही वेगळ्या घडामोडी पहाव्या लागतील हे मात्र येणारा काळच ठरवेल.
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)
Newschecker Team
March 25, 2020
Newschecker Team
April 23, 2020
Newschecker Team
February 14, 2020