अहमदनगर जिल्ह्यातील एका डाॅक्टरने देशी दारुच्या काढ्याने कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा दावा केला आहे. त्याने म्हटले आहे की त्याने आतापर्यंत 25 कोरोना रुग्णांना बरे केले आहे. डाॅक्टरच्या या दाव्याची राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी देखील दखल घेतली आहे. तसेच सोशल मीडियात देखील या दाव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
सोशल मीडियात कोरोनावर देशी दारुचा काढा ठरतोय उपयुक्त या शीर्षकाची बातमी व्हायरल होत आहे. आमच्या काही वाचकांनी ही बातमी आम्हाला व्हाट्सअॅप द्वारे पाठवली असून याची सत्यता पडताळणी करण्याची मागणी केली आहे. सोळ मीडिया प्लॅटफार्म शेअरचॅटवर देखील मोठ्या प्रमाणात युजर्स ही बातमी शेअर करत असल्याचे आढळून आले आहे.

बातमीच्या कात्रणावर राष्ट्र सह्याद्री या दैनिकाचे नाव असून 11 मे 2021 रोजी ही बातमी प्रसिद्ध झाल्याचे म्हटले आहे आम्ही खात्री करण्याकरिता या वृत्तपत्राची ई आवृत्ती पाहिली असता आम्हाला या ही बातमी या दैनिकात 11 मे रोजी प्रसिद्ध झाल्याचे आढळून आले.
बातमीत म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डाॅ. अरुण भिसे यांनी आपल्या दवाखान्यात आता पर्यंत 50 कोरोना रुग्णांना बरे केले आहे. यातील दहा रुग्ण गंभीर होते. या रुग्णांना नियमित उपचाराबरोबरच देशी दारुचा काढा सकाळी 30 मिली रात्री 30 मिली अशी मात्रा दिली असता सर्व रुग्ण बरे झाले.
टिव्ही 9 मराठी च्या बातमीत डाॅ. अरुण भिसे यांनी याबाबत माहिती दिल्याचे दिसून येते.
Fact Check/Verification
देशी दारुच्या किंवा अल्कोहोलच्या सेवनाने कोरोना रुग्ण खरंच बरा होतो का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी आम्ही सर्वप्रथम व्हायरल बातमी वाचली यात डाॅ. भिसे यांनी अनेक दावे केल्याचे आढळून आले. याची आम्ही पडताळणी करण्यास सुरुवात केली.
डाॅ. भिसे यांनी व्हायरल पोस्ट्समध्ये DRDOच्या औषधाच्या आणि अल्कोहोलच्या केमिकल फॉर्म्युल्यात साधर्म्य असल्याचा दावा केला आहे. पण हा दावा देखील चुकीचा आहे कारण केवळ ‘इमर्जन्सी’ वापरासाठी DRDOने तयार केलेले 2-Deoxy-D-Glucose हे रसायन आहे. याचा केमिकल फॉर्म्युला C6H12O5 असा आहे तर अल्कोहोलचा फॉर्म्युला C2H5OH असा आहे. या दोन्ही फोर्म्यूल्यांकडे पाहिल्यास त्यांच्यातील C,H,O एकसारखेच आहेत, पण शेवटचा आकडा बदलल्याने फाॅर्मुयला सारखा होत नाही. H2O या फोर्म्यूल्याने पाणी तयार होते तर H2O2 या फोर्म्यूल्याने ‘हायड्रोजन पॅराक्सॉईड’ तयार होते. हायड्रोजन पॅराक्सॉईड’ जखम धुण्यासाठी वापरतात त्याचे सेवन केल्यास मृत्यू ओढावू शकतो.
याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने देखील अल्कोहोल कोरोना पासून बचाव करत नसल्याचे म्हटले आहे.

राष्ट्र सह्याद्रीच्यी बातमीच्या शेवटच्या परिच्छेदात म्हटले आहे की शासकीय तज्ज्ञ समितीच्या सिफारशीनुसार रुग्णांवर उपचार सुरु ठेवले सोबतच देशी दारुचा काढा 30 मिली देखील दिला. मात्र डाॅक्टरांच्या यामाहितीवर किंवा उपचारावर प्रश्नचिन्ह उभे राहते कारण डाॅक्टरांच्या दवाखान्यात उपचार घेणारे रुग्ण तज्ज्ञ समितीने शिफारस केलेल्या औषधांच्या सेवनाने बरे झाले की देशी दारुच्या काढ्याने हे सांगणे कठिण आहे. कारण डाॅक्टरांनी देखील देशी दारुनेच रुग बरे झाल्याचा थेट पुरावा दिलेला नाही.
या बाबत अधिक शोध घेतला असता आम्हाला दैनिक लोकमतची बातमी आढळून आली. यात म्हटले की, शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामेश्वर काटे यांनी डॉ . भिसे यांना नोटीस काढून 24 तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत , तसेच तहसीलदार अर्चना पागिरे यांनी त्यांना संपर्क साधून बुधवारी तहसील कार्यालयात समक्ष हजर राहून खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत.

अधिक शोध घेतला असता आम्हाला 13 मे 2021 रोजीची महाराष्ट्र टाईम्सची बातमी आढळून आली ज्यात डाॅ. अरुण भिसे यांनी आपला दावा मागे घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे. बातमीत म्हटले आहे की,फक्त देशी दारूने करोना बरा होता, असा आपला दावा नाही. आपण केवळ आपला अनुभव सांगितला आहे. यात कोणाचीही दिशाभूल करण्याचा आपला उद्देश नाही. तथापि आपण आपली यासंबंधीची पोस्ट मागे घेत असून टास्क फोर्सने मान्यता देईपर्यंत कोणीही देशी दारूचा प्रयोग करू नये,’ असे म्हणत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी आपला दावा मागे घेतला आहे.
प्रशासनाकडून आलेल्या चौकशीच्या नोटिसीला त्यांनी उत्तर दिले असून संबंधित पोस्टही मागे घेतली आहे. ‘यानंतरही कोणी असा उपचार केला, तर होणाऱ्या परिणामांना तुम्हीच जबाबदार राहाल,’ असा इशाराही त्यांनी नागरिकांना दिला आहे. तीन दिवसांपूर्वी डॉ. भिसे यांनी एक पोस्ट लिहून करोना रुग्णाला काही दिवस दररोज ६० मिलीलीटर देशी दारू पाजल्यास करोना लवकर बरा होता असा दावा केला होता. आपण हा प्रयोग ५० रुग्णांवर केल्याचेही त्यांनी नमूद केले होते. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. आरोग्य विभाग आणि प्रशासनानेही याची दखल घेऊन डॉ. भिसे यांना नोटीस पाठविली. या नोटिशीला डॉ. भिसे यांनी उत्तर दिले आहे.
डाॅ. भिसे यांच्या फेसबुक पेजला आम्ही भेट दिली असता त्यांनी आपला दावा मागे गेत असल्याची पोस्ट लिहिली आहे.असल्याचे आढळून आले.
यात त्यांनी म्हटले आहे की,सर्वांना सांगू इच्छितो की मी फक्त आणि फक्त देशी दारूने (अल्कोहोल) ने कोरोना बरा होतो असा कोणताही दावा केलेला नाही. मी माझे पेशंटला icmr v शासनमान्य ॲलोपॅथीक औषधे पण त्यासोबत सुरू ठेवले होते व त्यातील काही अनुभव आपल्याला सांगितले होते. अल्कोहोल ला तज्ञांनी अगर शासनाने अजुन मान्यता दिलेली नाही त्यामुळे कोणी ही आपल्या पेशंटला संबंधित पोस्ट प्रमाणे अल्कोहोल देऊ नये. त्यासाठी योग्य तो आयुर्वेदिक व ॲलोपॅथीक शास्रोक्त अभ्यास करून कोवीड टास्क फोर्स ची परवानगी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत राहील. माझ्या पोस्ट चा गैरअर्थ काढून कोणी अपप्रचार करून व्यसनाचे किंवा दारूचे समर्थन करू नये. तुम्ही पेशंटला डाॅक्टर चा सल्ला न घेता चुकीचा उपचार स्वतःच्या मनाने केला तर होणा-या परिणामाला तुम्ही तुम्ही स्वतः जबाबदार राहाल..याची नोंद घ्यावी…. धन्यवाद!

Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, देशा दारुच्या काढ्याचे सेवन केल्याने कोरोना रुग्ण बरा होत असल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही सदर डाॅक्टरने देखील आपला दावा मागे घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या दाव्यावर विश्वास ठेवू नये.
Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?
Result: False
Claim Review: देशी दारुच्या सेवनाने कोरोना रुग्ण बरे होतात. Claimed By: Social Media post Fact Check: false |
Our Sources
Maharashtra Times- https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/dr-sanjay-bhise-using-alcohol-for-treat-coronavirus-patients-medical-officer-did-inquiry/articleshow/82597295.cms
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.