Claim–
हा कॅडबरी कंपनीतील कर्मचारी असून त्याने आपल्ये एचआयव्ही संक्रमित रक्त चाॅकलेटमध्ये मिसळले आहे. पुढील काही दिवस कॅडबरी चाॅकलेट खाऊ नका.

Verification–
शेयरचैट या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म वर एक फोटो शेयर होत असून यात एका व्यक्तीला काही लोक पकडून घेऊन चालल्याचे दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,
या माणसाने आपले एचआईव्ही संक्रमित रक्त कॅडबरी उत्पादनामध्ये मिसळे आहे, पुढील काही आठवड्यांसाठी कॅडबरीची कोणतीही उत्पादने खाऊ नका, कारण कंपनीच्या या कर्मचा-याने उत्पादने दूषित केली आहेत. हे काल बीबीस न्यूज वर दाखवण्यात आले आहे. कृपया आपणास ज्यांची काळजी वाटते त्या लोकांना हा संदेश पाठवा.
आम्ही याबाबत काही कीवर्ड्सच्या आधारे पडताळणी केली पण गूगलमध्ये कॅडबरी उत्पादनामध्ये एचआयव्ही संक्रमित कर्मचा-याने आपले रक्त मिसळल्याची कोणतीही बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही व्हायरल फोटो क्राॅप करुन रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला पाच वर्षावूर्वी informationng.com या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातमीत हा फोटो आढळून आला. यात बातमीत म्हटले आहे की, अबुजा येथील फेडरल हायकोर्टाने सोमवारी नायजेरिया पोलिस आणि राज्य सेवा विभागाला (डीएसएस) बोको हराम संघटनेचा संशयित सदस्य आणि न्यान्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार सादिक ओगव्यूचे याला हजर करण्याचे आदेश दिले.

याशिवाय आम्हाला cknnigeria.com नावाच्या वेबसाईटवर जुलै 2014 मधील एक बातमी आढळून आली यात म्हटले आहे कि न्यान्या बाॅम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधाराला सुदानमधून नायजेरियामध्ये आणण्यात आले आहे.

यासंदर्भात तेथील पोलिस प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली होती. सुदानमध्ये लपून बसलेल्या बाॅम्बस्फोटाच्या मास्टरमाईंडला सुदान पोलिस आणि इंटरपोलच्या मदतीने अखेर नायजेरियामध्ये आणण्यात आल्याची माहिती यात दिली आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की हा कॅडबरीत एचआयव्ही संक्रमित रक्त मिसळ्याचा दावा खोटा असून फोटोतील व्यक्ती ही कॅडबरी कंपनीचा कर्मचारी नसून नायजेरियातील बाॅम्बस्फोटाचा सूत्रधार बोको हराम या दहशतवादी संघटनेचा संशयित सदस्य सादिक ओगव्यूचे आहे.
Sources
Google Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)