Monday, April 29, 2024
Monday, April 29, 2024

HomeFact CheckWeekly wrap: आर्यन खानचे विमानतळावर मूत्रविसर्जन ते पाकिस्तानी खासदाराचा 'टिप-टिप बरसा'वर डांस,...

Weekly wrap: आर्यन खानचे विमानतळावर मूत्रविसर्जन ते पाकिस्तानी खासदाराचा ‘टिप-टिप बरसा’वर डांस, या आहेत सप्ताहातील टाॅप फेक न्यूज

Authors

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा नाही सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने विमानतळावरच लघवी केल्याच्या दाव्याने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पण हे खरे नाही. ‘अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने विमानतळावर लघवी केली’ या दाव्यासह शेअर केला जात असलेला हा व्हिडिओ प्रत्यक्षात ‘The Twilight Saga’मध्ये काम केलेल्या Bronson Pelletier चा आहे. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

महात्मा गांधींबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराजांना जामीन मंजूर झाला?

महात्मा गांधींबद्दल अवमानकारक टिप्पणी करणाऱ्या कालीचरण महाराजाला जामीन मंजूर झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही पोलीस कालीचरणला कुठेतरी घेऊन जाताना दिसत आहेत. यादरम्यान काही लोक जय श्री रामचा नारा देताना दिसत आहेत. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

सचिन तेंडूलकरने पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिला?

भारतरत्न सचिन तेंडूलकरने पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याच्या दाव्याने एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ पुरस्कार महत्त्वाचा नसून कर्तृत्व महत्त्वाचं असतं. कारण आज एका पद्मश्रीला भारतरत्नाने खांदा दिला. भावपूर्ण श्रद्धांजली माई.” पण हे खरे नाही. सचिनचा तीन वर्षापुर्वीचा फोटो व्हायरल झाला आहे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा

पाकिस्तानी खासदाराने ‘टिप टिप बरसा पानी’ वर डांस केला?

एका पाकिस्तानी खासदार अक्षय कुमार आणि रवीन टंडन यांच्या ‘टिप टिप बरसा पानी’ या प्रसिद्ध गाण्याच्या रिमिक्सवर नाचत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. अनेक वेबसाईट्सने देखील खासदार द अमीर लियाकत हुसैन हे नाचले असल्याची बातमी प्रसिद्ध केली आहे. पण हे खरे नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular