Thursday, October 6, 2022
Thursday, October 6, 2022

घरMarathiदारुच्या नशेत युवतीसोबत डान्स करणा-या अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ भाजपा नेत्याच्या नावाने व्हायरल

दारुच्या नशेत युवतीसोबत डान्स करणा-या अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ भाजपा नेत्याच्या नावाने व्हायरल

Claim- 
 
भाजप नेते योगेश पाटेल बॅंकाॅकमध्ये मोदीजींच्या विकास कार्यक्रमाला पुढे नेताना.
 
 
Verification-
 
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकी दरम्यान सोशल मिडियामध्ये भ्रामक दाव्याच्या बातम्यांची संख्या वाढली आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबद्दलची अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ट्विटरवर एका युजर ने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात एक उघडाबंब व्यक्ति दारु पिऊन युवती सोबत नृत्य करताना दिसत आहे. ट्विट मध्ये दावा करण्यात आला आहे की नृत्य करणारा इसम हा भारतीय जनता पार्टीचा नेता योगेश पाटेल आहे. 
 
या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही याबाबत गुगलवर शोध घेण्याचे ठरवले. सुरवातीला काही स्क्रिनशाॅट्सच्या मदतीने व्हिडिओचा शोधला असता काही परिणाम मिळाले पण व्हायरल व्हिडिओ आढळून आला नाही. 
 
 
 
व्हायरल दाव्याच्या पोस्टमध्ये  ‘योगेश पाटेल’ हे नाव व्याकरणानुसार योग्य न वाटल्याने आम्ही  योगेश पाटील और योगेश पटेल या दोन नावांच्या किवर्डसच्या आधारे शोध घेतला. पडताळणीमध्ये आम्हाला योगेश पाटील या नावाची माहिती मिळाली. गुगल वर मिळालेल्या माहितीनुसार योगेश पाटील हे 2004 ते 2009 या कालावधीतल भिवंडी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत होते. 
 
ट्विटमधील दाव्यामध्ये योगेश पाटील  हे भाजपाशी संबंधित असल्याचे म्हटले असल्यामुळे आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोषित उमेदवारांची नावांच्या यादीचा शोधली असता इंडिया टुडेच्या लेखात ती आढळून आली. पण यात योगेश पाटील नावाच्या नेत्याचा समावेश नव्हता. त्यामुळे आम्ही योगेश पटेल बीजेपी या नावाने गुगलवर शोध घेतला. यात गुजरातमधील भाजपा नेते योगेश पटेल यांचे नाव आढळून आले. 
 
 
योगेश पटेल यांच्या माहितीसोबतच त्यांचे फोटो देखील मिळाले. त्यांचे फोटो व्हायरल वीडिओतील व्यक्तिच्या चेह-याशी जुळवून पाहिले पण कुठल्याच अंगाने हा दोन्ही चेहरे एकसारखे दिसले नाहीत. 
 
 
 
newschecker.in टिमच्या पडताळणीत ट्विटरवरील दावा भ्रामक असल्याचे आढळून आले आहे.
 
Tools used 
 
  • InVID
  • Google search
  • Google reverse Image 
 
Result- Misleading
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular