Claim– दिल्लीत पराभव होण्याच्या भितीमुळे भाजपा नेते मनोज तिवारी यांनी पक्षाध्यक्षांना लिहिले पत्र.

Verification–
सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांना लिहिले पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पत्राविषयी दावा केला जात आहे की मनोज तिवारी यांनी दिल्लीत पराभव होण्याच्या भितीने हे पत्र पार्टी अध्यक्षांना लिहिले आहे.
काय म्हटले आहे या पत्रात ?
या पत्रात मनोज तिवारी यांनी पार्टी अध्यक्षांना दिल्ली निवडणुकीच्या प्रचारापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना प्रचारापासून दूर ठेवण्याची विनंती केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीचा निकाल आपणास अनुकूल असा आला नाही तर पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये असे मला वाटते.
आम्ही या बाबत पड़ताळणी करण्याचे ठरविले असता मनोज तिवारी यांनी असे पत्र लिहले आहे का याचा शोध सुरु केला असता आम्हाला मनोज तिवारी यांचे डिसेंबर 2019 मधील दिल्ली भाजपाच्या लेटरहेडवर लिहिलेले पत्र आज तक या वेबसाईटवर आढळून आले. ते तुम्ही खाली पाहू शकता.

सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या लेटरहेड मध्ये अनेक बाबी वेगळ्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कमळाच्या चिन्हाचा रंग बदलण्यात आला आहे जो ओरिजनल लेटरहेडमध्ये पांढरा आहे मात्र व्हायरलमध्ये केसरी आहे. भाजपाने 2014 मध्येच केसरी रंग बदलला असून तो पांढरा करण्यात आला आहे. याशिवाय व्हायरल लेटरमध्ये एका बाजूच्या पट्ट्या गायब आहेत. ओरिजनल लेटरमध्ये भारतीय जनता पार्टी दिल्ली प्रदेश हे नाव हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिले आहे मात्र व्हायरल लेटरमध्ये हे नाव फक्त हिंदीतच लिहिले आहे. याशिवाय ओरिजन लेटरमध्ये 14 पंडित पंत मार्गवरील स्टेट आॅफिसचा पत्ता आहे तर, व्हायरल लेटरवर भाजपा मुख्यालयाचा पत्ता आहे.

याशिवाय दिल्ली भाजपच्या सोशल मीडिया यूनिटकडून देखील सांगण्यात आले आहे की व्हायरल झालेले पत्र हे बनावट आहे.
यावरुन हेच सिद्ध होते की, दिल्लीतील भाजप नेते मनोज तिवारी यांच्या नावाने व्हायरल होत असलेले पत्र हे बनावट असून दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान मुद्दाम व्हायरल करण्यात करून भ्रामकता निर्माण करण्यात येत आहे.
Sources
Google Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)