Friday, June 14, 2024
Friday, June 14, 2024

HomeMarathiनीरव मोदीने काॅंग्रेसच्या नेत्यांना खरंच लाच दिली? काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य 

नीरव मोदीने काॅंग्रेसच्या नेत्यांना खरंच लाच दिली? काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य 

Authors

Claim
नीरव मोदीने भारतातून पळून जाण्यासाठी कांग्रेसच्या नेत्यांना 456 कोटींची लाच दिली. राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा ने नीरवला पळवून लावले.
Verification
ट्विटरवर सध्या एक ट्विट व्हायरल होत आहे. यात लिहिले आहे की पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याने लंडनच्या कोर्टात सांगितले आहे की त्याला काॅंग्रेसच्या नेत्यांनीच भारतातून पळवून लावले आहे यासाठी त्यांनी 456 कोटींची लाच घेतली आहे. ट्विटमध्ये इंडियन नॅशनल काॅंग्रेसच्या नावाचा 98 कोटींचा चेकचा फोटो देखील शेयर करण्यात आला आहे. ट्विटमघ्ये दावा करण्यात आला आहे की  चौकीदाराला चोर म्हणणा-यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.आम्ही याबाबत शोध घेतला असता अशाच दावा असणारे आणखी एक ट्विट आढळून आले.
यावरुन आम्ही काही कीवर्ड्च्या आधारे नीरव मोदीबद्दल काही माहिती मिळतेय हे पाहण्यासाठी गूगलमध्ये शोध घेतला असता याबाबत अनेक बातम्या आढळून आल्या.
आम्हाला इकाॅनाॅमिक टाईम्समध्ये लंडनच्या कोर्टाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून त्याची न्यायालयीन कोठडीत वाढ केल्याची बातमी आढळून आली. मात्र शिवाय यात कांग्रेसला लाच दिल्याचा उल्लेख देखील नाही. आम्ही याबाबत इंग्लंडमधील किंवा भारतातील प्रतिष्ठित माध्यमांनी बातमी दिली आहे का याचा शोध घेतला असता आम्हाला नीरव मोदीने काॅंग्रेसला किंवा राहुंल गांधी यांना लाच दिल्याची कोणतीही बातमी आढळून आली नाही. त्यामुळे हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले, मात्र व्हायरल चेकचे काय सत्य आहे हे पडताळून पाहणे बाकी होते. आम्ही हा चेक बारकाईने पाहिला असता यात ब-याच चुका दिसून आल्या.
1.  चेकच्या कोप-यात क्राॅसचे चिन्ह नाही.
2. Ninety हा शब्दाचे “Ninenty असे चुकीचे स्पेलिंग लिहिले आहे. नीरव मोदी अशी घोडचूक कशी काय करु शकतो.
3.  नीरव मोदी यांच्या स्वाक्षर्‍याखाली असलेले नाव ओरखडे काढून टाकले गेले आहे. आपण बारकाईने पाहिले तर आडनाव “थापा” म्हणून वाचले जाऊ शकते.
4.चेकवरील तारीख 25/09/2011 आहे याचाच अर्थ हा चेक सुमारे 7.5 वर्षांपासून पडलेला आहे. तो अजूनही वापरात नाही.
याचा अर्थ स्पष्ट आहे की हा चेक खोटा आहे, फोटोशाॅपच्या मदतीने जुन्या चेकचा फोटो एडिट करुन तो खरा असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
आमच्या पडताळणीत आढळून आले आहे की नीरव मोदी याने कांग्रेसच्या नेत्यांना लाच दिल्याची बातमी कुठेही नाही शिवाय व्हायरल फोटोतील चेक देखील खोटा आहे, सोशल मीडियात भ्रामक माहिती पसरवली जात आहे.
Tools Used 
Google Search
Twitter Advanced Search
Result- Fake
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular