Thursday, December 12, 2024
Thursday, December 12, 2024

HomeMarathiभाजपा अध्यक्षांना सीएएचे फायदे सांगताना स्थानिकांनी केली नाही मारहाण, जुनाच व्हिडिओ व्हायरल

भाजपा अध्यक्षांना सीएएचे फायदे सांगताना स्थानिकांनी केली नाही मारहाण, जुनाच व्हिडिओ व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

पश्चिम बंगाल बीजेपी प्रदेशाध्यक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दार्जिलिंगमध्ये स्थानिक लोकांनी मारहाण केली. ते स्थानिक लोकांना प्रभावित करत सीएए चे फायदे सांगत होते. 

Verification
ट्विटरवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक बीजेपीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे कि हा व्हिडिओ पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर दार्जिंलिंगमध्ये केलेल्या हल्ल्याचा आहे. ते स्थानिक लोकांना सीएएचे फायदे सांगून प्रभावित करत होते. 
याबाबत आम्ही शोध घेतला असता काही ट्विटरवर आणखी एक हॅंडलवर हा व्हिडिओ याच दाव्याने शेअर केल्याचे आढळून आले. 
आम्ही याबाबत शोध सुरुच ठेवला असता आम्हाला  दोन वर्षापूर्वीची The Hindu या इंग्रजी वर्तमानपत्राच्या  वेबसाईटवरील एक बातमी मिळाली यात म्हटले आहे की बंगाल भाजपचे प्रमुख दिलीप घोष यांना हालून देण्यात आले तसेच त्यांच्या समर्थकांवर गुरुवारी दार्जिलिंग स्थानिक लोकांनी हल्ला केला. दार्जिलिंगच्या दोन दिवसांच्या दौ-यावर असलेले श्री. घोष एका सभागृहात सभेला संबोधित करीत होते, तेव्हा काही लोक त्यांच्या भाषणात अडथळा आणू लागले यानंतर घोष आपल्या समर्थकांसह बाहेर पडले मात्र स्थानिक लोकांनी त्यांचा पाठलाग करत कार्यकर्त्यांना मारहाण केली. 
याशिवाय आम्हाला जनसत्ता या हिंदी वेबसाईटवर देखील ही बातमी आढळली. यात बातमीत म्हटले आहे की, घोष यांनी गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा तसेच या हल्ल्यासाठी ममता बॅनर्जी यांचे सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते.
याशिवाय आम्हाला दार्जिलिंग टाईम्सच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ आढळून आला.
शिवाय एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या बातमीचा व्हिडिओ देखील युट्यूबवर आढळून आला. 
यावरुन हेच स्पष्ट होते की पश्चिम बंगाल भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांचा दोन वर्षांपुर्वींचा व्हिडिओ सध्या सीएएच्या संदर्भात व्हायरल होत आहे. 
Sources 
  • Twitter Advanced Search 
  • Facebook Advanced Search 
  • Google Search 
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular