Tuesday, November 5, 2024
Tuesday, November 5, 2024

HomeFact CheckFact Check: यूपीमध्ये नग्न अवस्थेत आंदोलन करणाऱ्या तृतीयपंथींचा व्हिडिओ मणिपूरचा म्हणून दिशाभूल...

Fact Check: यूपीमध्ये नग्न अवस्थेत आंदोलन करणाऱ्या तृतीयपंथींचा व्हिडिओ मणिपूरचा म्हणून दिशाभूल करीत व्हायरल

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
मणिपूरमध्ये काँग्रेसच्या सांगण्यावरून नग्न महिलांचे पथक पोलिसांचा पाठलाग करून आंदोलन करत आहे.
Fact
हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील चंदौली येथील नागरी निवडणुकांदरम्यान झालेल्या हेराफेरीच्या वादाचा आहे.

मणिपूरमधील नग्न महिलांचे पथक पोलिसांचा पाठलाग करून निषेध करत आहे आणि हे सर्व काँग्रेसच्या सांगण्यावरून सुरु असल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करीत केला जात आहे.

“मणिपूरमध्ये काँग्रेसच्या सांगण्यावरून पोलीस आणि लष्कराचा निषेध करण्यासाठी नग्न महिलांची एक वेगळी टीम तयार करण्यात आली आहे, म्हणजे त्या नग्न अवस्थेत पोलिसांचा पाठलाग करत आहेत, म्हणजे तिथे कसले षडयंत्र सुरू आहे, याची कल्पना करा. आणि चमचे इथे नाचत आहेत. हा कट अंमलात आणण्यासाठी राहुल गेंडी मणिपूरला गेला होता, त्याचवेळी कुकी महिलांनी लष्कराला नग्न होऊन विरोध करण्याची धमकी दिली होती. आणि इथेच वास्तव आहे..!!” अशा कॅप्शनखाली सोशल मीडिया युजर्स व्हायरल व्हिडीओ पोस्ट करीत असल्याचेही आमच्या निदर्शनास आले आहे.

नुकताच मणिपूरमधील अश्लीलता आणि अमानुषतेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्याला पाहून देशवासीय संतापले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 4 मे 2023 रोजी झालेल्या या घटनेतील 4 आरोपींना अटक केली. यापूर्वी, भारतीय लष्कराच्या स्पीयर कॉर्प्सने मणिपूरमधील महिला कार्यकर्त्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कराच्या कामात जाणीवपूर्वक हस्तक्षेप करत असल्याची माहिती देणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.

या क्रमाने, सोशल मीडिया युजर्स असा दावा करत आहेत की मणिपूरमध्ये नग्न महिलांची एक टीम पोलिसांचा पाठलाग करून निषेध करत आहे.

Fact Check: यूपीमध्ये नग्न अवस्थेत आंदोलन करणाऱ्या तृतीयपंथींचा व्हिडिओ मणिपूरचा म्हणून दिशाभूल करीत व्हायरल
व्हायरल दावा

Fact Check/ Verification

मणिपूरमध्ये पोलिसांचा पाठलाग करणार्‍या नग्न महिलांच्या टीमच्या निषेधाच्या नावाने शेअर केलेल्या या व्हिडिओची पडताळणी करताना, आम्हाला त्याची एक मुख्य फ्रेम Google वर सापडली. शोध प्रक्रियेतून मिळालेल्या निकालांवरून, आम्हाला कळले की हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमध्ये मे 2023 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकांचा आहे. पत्रकार ज्ञानेंद्र शुक्ला यांनी शेअर केलेल्या ट्विटनुसार, हा व्हिडिओ चंदौली जिल्ह्यातील मुगलसराय नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीचा आहे, जिथे किन्नर (तृतीयपंथी) समाजातील लोकांनी सोनू किन्नर नावाच्या उमेदवाराशी झालेल्या हेराफेरीच्या विरोधात नग्न निषेध केला. (सूचना: व्हिडिओमध्ये नग्नतेची दृश्ये आहेत.)

Fact Check: यूपीमध्ये नग्न अवस्थेत आंदोलन करणाऱ्या तृतीयपंथींचा व्हिडिओ मणिपूरचा म्हणून दिशाभूल करीत व्हायरल
व्हायरल दावा

वरील ट्विटमध्ये असलेल्या माहितीचा वापर करून, ‘चंदौली सोनू किन्नर’ या कीवर्डचा वापर करून ट्विटर शोधामुळे आम्हाला मे 2023 मध्ये UP Tak, News18 आणि Zee उत्तर प्रदेश उत्तराखंड यांनी शेअर केलेल्या ट्वीट्सकडे नेले, ज्यात हि घटना चंदौलीला झाल्याचे म्हटलेले आहे.

YouTube वर ‘चंदौली सोनू किन्नर विरोध’ हा कीवर्ड शोधल्यावर, आम्हाला ABP News आणि UP Tak द्वारे प्रकाशित व्हिडिओ रिपोर्ट्स आढळले, ज्यामध्ये सोनू किन्नर नावाच्या उमेदवाराच्या समर्थकांनी मतांची पुनर्मोजणी करण्याच्या मागणीसाठी केलेल्या निषेधाची माहिती दिली आहे.

Conclusion

अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट होते की, मणिपूरमधील नग्न महिलांच्या टीमने काँग्रेसच्या सांगण्यावरून पोलिसांचा पाठलाग करून निषेध केल्याच्या नावाखाली केलेला हा दावा दिशाभूल करणारा आहे. वास्तविक हा व्हिडिओ चंदौलीच्या मुगलसराय नगरपरिषदेचा आहे, जिथे किन्नर समाजाने अध्यक्षपदाचे उमेदवार सोनू किन्नरच्या समर्थनार्थ निदर्शने केली, त्यानंतर झालेल्या मतमोजणीत सोनू किन्नरला विजयी घोषित करण्यात आले.

Result: False

Our Sources
Tweet shared by Gyandendra Shukla on 16 May, 2023
Media reports


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Most Popular