Claim–
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नवीन भारतीय संविधान तयार केले आहे.
Verification–
प्रतिक पाटील नावाच्या ट्विटर हॅंडलवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या फोटोसह नया भारतीय संविधान असा मजकूर लिहिलेले मुखपृष्ठ तसेच आणखी काही पाने शेअर करण्यात आली आहेत. ट्विटमध्ये म्हटले आहे कि संघाचे नवीन संविधान? ही नेमकी काय भानगड आहे, प्रकरण अतिशय गंभीर दिसतंय. संविधान बदलण्याचा हा डाव असेल तर यावर कारवाई करायला हवी.
आम्ही संदर्भात पडताळणी सुरु केली असता फेसबुकवर याच दाव्याच्या अनेक पोस्ट आढळून आल्या.
याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) काही घोषणा केली आहे का याचा शोध सुरु केला. मात्र आम्हाला संघाने नवीन भारतीय संविधान तयार केल्याची बातमी कुठेही आढळून आली नाही. यासंदर्भात आणखी शोध घेतला असता
आज तक या वेबसाईटवर मोहन भागवत यांच्याविषयीची बातमी आढळून आली. या म्हटले आहे की, सोशल मीडियामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या फोटोसह नवीन भारतीय संविधान नावाचा मजकूर व्हायरल होत आहे. या प्रकरणी लखनौ नंतर अहमदाबाद मध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमीत पुढे म्हटले आहे. आरएससचे वकील दिनेश वाला यांनी यांनी तक्रार केली होती.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर मध्ये ही संरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाने खोटी माहिती व्हायरल करणा-या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यावरुन हेच स्पष्ट होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या फोटोसह नवीन भारतीय संविधानाचा जो मजकूर व्हायरल होत आहे तो पूर्णपणे खोटा आहे.
Sources
Twitter Advanced Search
Facebook Search
Google Search
Result- False