Thursday, June 20, 2024
Thursday, June 20, 2024

HomeMarathiशिवसेना आमदाराने विधानसभेतच वारिस पठाण यांना कुत्रा म्हटले नाही, व्हायरल झाला जुना व्हिडिओ

शिवसेना आमदाराने विधानसभेतच वारिस पठाण यांना कुत्रा म्हटले नाही, व्हायरल झाला जुना व्हिडिओ

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

आपण इकडे ट्रम्प यांच्या स्वागतामध्ये व्यस्त असताना तिकडे एका शिवसेना आमदाराचा स्वाभिमान जागृत झाला, त्याने भर विधानसभेत वारिस पठाणला कुत्रा म्हटले.

Verification
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ या पॅरोडी ट्विटर हॅंडवर शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्या विधिमंडळातील भाषणाची एक व्हिडिओ क्लिप शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की आपण इकेड अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्या स्वागतासाठी व्यस्त असताना तिकेड शिवसेना आमदाराने भर विधानसभेतच वारिस पठाण यांना कुत्रा म्हटले आहे.
आम्ही याबाबत पडताळणी सुरु केली तेव्हा फेसबुकवर देखील अनेक पोस्टमध्ये हा व्हिडिओ आढळून आला.
पडताळणीत आढळून आले की आयबीएन लोकमत नावाच्या टिव्ही चॅनलच्या बातमीचा हा व्हिडिओ आहे. आम्ही काही कीवर्ड्च्या आधारे याबाबत शोध घेतला असता आम्हाला तीन वर्षापूर्वीचा हा ओरिजनल व्हिडिओ आढळून आला. यात शिवसेना आमदार गुलाबराव पाटील विधानसभेत आपल्या भाषणात म्हणतात की, ज्यांना वंदे मातरम म्हणण्याची लाज वाटते त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही अध्यक्ष महोदय, भारत माती की जय न बोलण्याची मग्रुरी जर यांच्यात असेल तर अध्यक्ष महोदय , हे फक्त दोन सभासद आहेत,या ठिकाणी कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि अपक्ष देखील आहेत सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे की देश महत्वाचा आहे, असे म्हणून ते इस देश में रहना है तो कुत्तो वंदे मातरम् कहना होगा असे म्हणताना दिसत आहेत. यावेळी सदनात एमआयएमचे नेते वारिस पठाण आणि इम्तियाज जलील देखील दिसत आहेत.
आमदार गुलाबराव पाटील यांनी तत्कालिन आमदार वारिस पठाण यांचे निलंबन करण्याची मागणी केली होती. यानंतर ‘भारत माता की जय’ सक्तीने म्हटणार नाही, यासह काही वक्तव्ये केल्याच्या कारणावरुन एमआयएमचे आमदार पठाण यांना अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले होते.
वारिस पठाण यांनी भारत माता की जय म्हणण्यास नकार देताना जी कारणे दिली त्याचा एक व्हिडिओ क्विंटच्या युट्यूब चॅनलवर आढळून आला. 
 
यावरुन हेच स्पष्ट होते की हा व्हिडिओ जुना आहे, वारिस पठाण आता आमदार नाहीत तर इम्तियाज जलील हे लोकसभा सदस्य आहेत, शिवाय आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीचे नाव सध्या न्यूज 18 लोकमत असे आहे. जुना व्हिडिओ आत्ताचा असल्याचा भास निर्माण करुन सोशल मीडियात खोटी माहिती पसरवली जात आहे.
Sources 
Twitter Advanced Search
 Facebook Search
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular