Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeMarathiझारखंड पोलिसांचा माॅकड्रिलचा व्हिडिओ भारतीय सेनेच्या अत्याचाराच्या नावाने व्हायरल

झारखंड पोलिसांचा माॅकड्रिलचा व्हिडिओ भारतीय सेनेच्या अत्याचाराच्या नावाने व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

भारतीय सेनेचे जवान काश्मिरमधील लोकांवर फायरिंग करत आहेत पण जगाला हे माहित नाही.

Verification
Abdul Wajid नावाच्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोग रस्त्यावर आंदोलन करत असताना पोलिस त्यांच्यावर फायरिंग करतात आणि यात दोन लोक खाली पडताना दिसत आहे. ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे कि भारतीय सेनेचे जवान काश्मिरमधील लोकांवर आज देखील फायरिंग करत आहेत आणि ये जगाला दिसत नाही.
आम्ही ट्विटर वर केलेल्या दाव्यासंबंधी पडताळणी करण्याचे ठरविले. व्हायरल व्हिडिओ बारकाईने पाहिला. या व्हिडिओत काही लोग आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी रस्त्यावर घोषणा देत आहेत तर तीन पोलिस त्यांच्या पासून काही अंतरावर बंदुकीचा निशाना लावून बसले आहेत. त्यापैकी दोन पोलिस जमावावार फायरिंग करतात आणि त्यातील दोन लोक जमिनीवर कोसळतात. त्याचवेळ तिसरा पोलिस कर्मचारी फटाके फोडतो. काही लोक स्ट्रेचर घेऊन जातात त्याच सोबत अॅम्बुलंस देखील जाते व जखमींना हाॅस्पिटलकडे रवाना केले जाते. एवढे सगळे होत असताना रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने जमलेले लोक मात्र शांत चित्ताने हे सगळे पाहत असताना दिसते. शिवाय अॅम्बुलंस गेल्यानंतर कॅम-यामागे उभा असलेला व्यक्ती पोलिसांनी तत्परता दाखवली अशीच तत्परता प्रत्येक वेळी दाखवावी लागते असे हिंदीत सांगतो.
ट्विटमध्ये आर्मी जवानांचा उल्लेख केला होता पण व्हिडिओत पोलिस दिसत आहेत शिवाय व्हिडिओमध्येही तो व्यक्ति पोलिस असाच उल्लेख करतो त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे हे सिद्ध झाले पण व्हिडिओबद्दल पूर्ण माहिती मिळत नसल्याने आम्ही शोध सुरू ठेवला.
यासाठी व्हिडिओमधून काही स्क्रिनशाॅट्स काढले आणि गूगल रिव्हर्स इमेज आणि यांडेक्सच्या मदतीने शोध घेतला या व्हिडिओसंबंधीचे अनेक परिणाम समोर आले.
याच दरम्यान आम्हाला यूट्यूबवर हा व्हिडिओ आढळून आला. जो दोन वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये हा व्हिडिओ झारखंडमधील खुंटी पोलिसांच्या माॅकड्रिलचा असल्याचे म्हटले आहे.
यावरुन स्पष्ट होते की कश्मिरसंदर्भात कलम 370 रद्द केल्यानंतर भारतीय सेनेने तेथील जनतेवर फायरिंग केलेली नाही. झारखंड पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या माॅकड्रिलचा व्हिडिओ भारतीय सेनेच्या नावाने खोटया दाव्यानिशी शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ या आधी देखील कधी शेतकरी आंदोलन तर कधी विद्यार्थी आंदोलनाच्या नावाने सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.
Tools Used 
  • Twitter Advanced Search
  • Google Reverse Image
  • Yandex Image
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular