Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeMarathiमहाराष्ट्रात शेतक-यांच्या आत्महत्यांचे जळजळीत वास्तव

महाराष्ट्रात शेतक-यांच्या आत्महत्यांचे जळजळीत वास्तव

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

देशभरात मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, शेतक-यांच्या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. देशभरात काही राज्यामंध्ये शेतकरी आत्महत्या या मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत मात्र देशात सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत असल्याचे अनेक रिपोर्टमधून शिवाय सरकारी आकडेवारीतूनदेखील स्पष्ट झाले आहे. देशातील पहिली शेतकरी आत्महत्या ही देखील महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात झाली होती. हा जिल्हा आजही सर्वाधिक आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता त्याची जागा आता अमरावती जिल्हयाने घेतली आहे. या लेखात आपण मागील सहा वर्षात महाराष्ट्रात किती शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत. 
 
महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षात राज्यात (2013 ते 2019) 15000 पेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्याची बाब उघड झाली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. माहिती अधिकारात ही बाब समोर आलेली आहे. याबद्दल बिझनेस टुडे या दैनिकात बातमी छापून आली होती.  राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. 
 
 
सहा वर्षांच्या कालावधीत एकूण 15,3566 शेतकरी आत्महत्यांपैकी 1 जानेवारी 2019  तो 1 February फेब्रुवारी 2019 या कालावधीत 396 प्रकरणे नोंदली गेली आहेत. आतापर्यंत सरकारने यातील 120 कुटुंबांना मदती दिली आहे अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी दिली आहे. बिझनेस टुडेत मागील सहा वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी देण्यात आली आहे. 
 
 
गेल्या वर्षी म्हणजे साल 2019 मध्ये  1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या दो महिन्यांच्या कालावधीत सगळ्यात जास्त आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. याचीही आकडेवारी या लेखात देण्यात आली आहे. 
 
 
या तक्त्यावरुन लक्षात येते की सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात होत आहेत. याची काही कारणे आहेत. विदर्भात अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा हे सहा जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखले जातात. सततची नापिकी, दुष्काळ आणि सिंचनांच्या सोईंचा अभाव शिवाय कर्जाचा विळखा यामुळे शेतक-यांवर ही वेळ ओढवल्याची ही काही कारणे आहेत. 
 
मागील तीन वर्षात 2015 ते 2018 या वर्षात राज्यात 12101 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी सरकारनेच जाहीर केली आहे. इंडिया टुडेच्या बातमीत याबाबत माहिती देण्यात आली आहे. विधानसभेत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीच ही माहिती दिल्याचे बातमीत म्हटले आहे.
 
 
कर्जाच्या विळख्यामुळे 2017 या एका वर्षात 4500 शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. याबाबत द हिंदू या दैनिकाने बातमी छापली होती. 
 
 
शेतकरी आत्महत्यांची कारणे आणि वाढता आलेख
चार वर्षापूर्वी प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती दिसून आली. 18 ते 45 वर्ष वयोगटातील तरुण शेतकऱ्यांनी जास्त आत्महत्या केल्या आहेत. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ तर कधी सुलतानी संकट यांना शेतकरी सामोरा जात आहे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने देखील शेतकरी त्रस्त झाला आहे. नराश्यातून शेतकरी जीवन संपवून टाकण्याचा अप्रिय निर्णय घेतो. केद्र आणि राज्य सरकारांचे कोटय़वधीचे पॅकेजही शेतकरी आत्महत्या थांबवण्यात अपयशी ठरले आहेत. मागील 13 वर्षांपासून आत्महत्यांचा आलेख वाढतच असल्याचे चित्र आहे. 
 
यावरुन हेच स्पष्ट होते की सरकार कोणतेही असो प्रगतीशील समजल्या जाणा-या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत किंबहुना त्यात वाढ झालेली आहे. ही बाब केंद्र आणि राज्याच्या दृष्टीने देखील गंभीर आहे, मात्र सरकार कोणतेही असो यावरुन फारच कमी उपाय योजना झाल्याचे दिसून येते. 
 
 
Sources
 
  • Business Today
  • The Hindu business line
  • India Today
  • Indian Express Group

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular