Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeMarathiNovel Coronavirus: 2019-nCoV शी संबंधित प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला माहिती असायला हवी

Novel Coronavirus: 2019-nCoV शी संबंधित प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला माहिती असायला हवी

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

चीनमधील वुहान शहरानंतर नोव्हल कोराना व्हायरस (2019-nCoV)  आता अमेरिकेसह आशियातील अनेक देशात पोहचला आहे. आतापर्यंत चीनमध्ये या व्हायरसची 800 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत तिकडे MRC Centre for Global Infectious Disease Analysis यांच्या नुसार चीनच्या बाहेर सुद्धा या व्हायरसची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामुळे ही संख्या आता जवळ-जवळ 4000 पर्यंत पोहचली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO)  या व्हायरस वर बारिक नजर ठेऊन आहे आणि या बाबतीत अपडेट लोकांपर्यत पोहचवत आहेत. 

कोणकोणत्या देशांत आढळला 2019-nCoV (Novel Coronavirus)?

चीननंतर  हा व्हायरसचा संक्रमित रुग्ण अमेरिकेत आढळला जो चीन मधील वुहान मधून अमेरिकेत आला होता. तसेच जपान, दक्षिण कोरिया थायलंड मध्ये देखील या व्हायरस से रुग्ण आढळले आहेत. WHO ने इतर देशांना आवाहन केले आहे या देशांत सध्या जाणे टाळले पाहिजे. तसेच चीनने देखील याचे संक्रमण टाळण्यासाठी आपल्या नागरिकांना वुहान शहरात जाणे टाळावे असे सांगितले आहे. तसेच वुहान शहरातील नागरिकांना शक्यतो शहराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. 

भारतात काय आहे Novel Coronavirus (2019-nCoV) ची परिस्थिती?

सध्यातरी भारताेेला या व्हायरस पासून कोणताही धोका नाही। नुकतेच मुंबईत चीन वरुन आलेल्या दोन लोकांना चिंचपोकळी मधील कस्तुरबा हाॅस्पिटलमध्ये डाॅक्टरांच्या निगराणीमध्ये ठेवण्यात आले आहे. याआधी अशी बातमी आली होती कि सौदी अरबमध्ये काम करणारी एक केरळची नर्स या व्हायरसने ग्रस्त झाली आहे पण सौदीने यावर हे चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार नर्सला 2019-nCoV (Novel Coronavirus) चे नाही तर MERS CoV चे संक्रमण झाले आहे आणि तिच्यावर उपचार सुरु आहेत.

चीन मधील शेनजेन शहरात एका भारतीय महिलेच्या शरीरात हा व्हायरस आढळून आला. तिच्यावर तेथील हाॅस्पिटलमध्ये उपचार सुुरु आहेत.  तसेच वुहान शहरात जवजवळ 25 भारतीय अडकल्याची माहिती मिळतेय. भारतीय दुतावासाने चीनमध्ये राहणा-या भारतीयांसाठी हाॅटलाईन नंबरची सेवा सुरु केली आहे.  लोक +8618612083629 आणि +8618612083617 या नंबर वर काॅल करुन आपल्या परिवाराची चौकशी करु शकता। तसेच भारतीय दुतावास आपल्या नागिरकांच्या सुरक्षिततेसाठी सतत चीनी अधिका-यांच्या संपर्कांत आहे.  भारतात देखील विमानतळांवर स्क्रीनिंग केली जात आहे. आणि परदेशातून विशेषकरुन चीनमधून येणा-या लोकांची निगराणी केली जात आहे. भारत सरकारने नागरिकांसाठी ट्रॅव्हल अडव्हायझरी देखील जारी केली आहे. या व्हायरससंबंधी माहिती आणि लक्षणे याबाबत जागोजागी पोस्टर लावले गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना या व्हायरसबद्दल सतर्क, आणि सज्ज राहण्यास सांगितले आहे. 

Novel Coronavirus (2019-nCoV) संबंधित Fake News 

2019-nCoV च्या बाबतीत देखील काही फेक न्यूज व्हायरल होऊ लागल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त शेअर करण्यात आलेली बातमी अशी की चीनध्ये Severe Acute Respiratory Syndrome (SARS) म्हणजे गंभीर तीक्ष्ण श्वसनाच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. 

 

1. चीनमध्ये Severe Acute Respiratory Syndrome (SARS) ने पुन्हा डोके वर काढले ?

नोवल कोरोनावायरसचे प्रकरण समोर येताच चीनमध्ये सध्या Severe Acute Respiratory Syndrome  ने पुन्हा एकदा डोके वर काढल्याची अफवा पसरली आहे. मात्र जाणकारांच्या म्हणण्यानुसार 2019-nCoV आणि SARS एक नाहीत. 

Coronavirus मध्ये जवळ-जवळ 6 प्रकारचे व्हायरस असतात. ज्यात SARS आणि MERS चा देखील समावेश होतो.  शामिल हैं तर  2019-nCoV म्हणेज Novel Coronavirus एक नवा व्हायरस आला आहे त्यामुळे आता ही संख्या 7 झाली आहे. 

2. फार्मा कंपन्यांच्या फायद्यासाठी व्हायरसची भिती पसरवली जात आहे ?

सोशल मीडिया असा दावा केला जात आहे की सध्या जो व्हायरस आला आहे त्याचे औषध आधीच उपलब्ध आहे. दाव्यात म्हटले आहे की हे सगळं फार्मा कंपन्यांचा फायदा व्हावा म्हणून केले जात आहे. 

Hoax Alert ने या क्लेमचे फॅक्ट चेकिंग केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या पेंटेंटची चर्चा केली जात आहे ते 2002 मध्ये चीनमध्ये पसरलेल्या SARS शी संबंधित आहे. SARS मुळे चीनमध्ये जवळजवळ 800 पेक्षा जास्त लोकांना जीव गमावावा लागला होता. तसेच पोस्टमध्ये औषध उपलब्ध असल्याचा दावा देखील चुकीचा आहे. NIH च्या एका वरिष्ठ अधिकारीच्या म्हणण्यानुसार या व्हायरसशी लडण्यासाठी पुढील तीन महिन्यांत औषध तयार केले जाऊ शकते. 

कुठून पसरला 2019-nCoV (Novel Coronavirus)?

WHO ने दिलेल्या माहितीनुसार वुहान शहरात 31 डिसेंबर 2019 मध्ये निमोनियाची अनेक प्रकरणे दाखल झाली होती. रुग्णामंध्ये आढळलेला व्हायरस आधीच्या कोणत्याच व्हायरसशी मिळताजुळता नव्हता त्यामुळे चिंता वाढली. एक आठवड्यानंतर चिनी अधिका-यांनी मान्य केले की हा नवीन व्हायरस एक कोरोनाव्हायरस आहे। या व्हायरसला नाव दिले गेले ‘2019-nCoV’. 

याचा प्राथमिक स्त्रोत काय आहे हे अजून माहिती झालेले नाही. पण हे स्पष्ट झाले की हा व्हायरस वुहान मधील सी-फूड मार्केमधून पसरलेला नाही. काण मागील आठवड्यात 15 टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण मार्केट मध्ये गेले होते. ताज्या संशोधनानुसार व्हायरसने ग्रस्त रुग्ण जनावरांच्या संपर्कात होते जसे की जिथे सी फूड मिळते किंवा कोंबडीपालन होते, साप किंवा जिथ जिथे जनावरे विकली जातात. हे संक्रमण सापांद्वारे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

Novel Coronavirus व्हायरसची लक्षणे?

2019-nCoV च्या रुग्णांमध्ये साधारपणे खोकला, गळा दुखणे, श्वास घेण्यास अडचण ताप इत्यादी प्राथमिक लक्षणेे दिसून येतात. या नंतर निमोनिया आणि किडनीेचे नुकसान होण्याचा धोका असतो.  

Novel Coronavirus व्हायरसपासून बचाव

या संक्रमणग्रस्त परिसरात जाणे टाळा. जर तुम्ही अशा परिसराच्या भोवताली राहत असला तर याची काळजी घ्या.

1. हात साबणाने स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायजरचा वापर करा 

2. नाक आणि तोडं लपेटून घ्या. 

3. आजारी लोकांपासून दूर रहा. त्याची भांडी वापरु नका यामुळे तुम्ही आणि रुग्ण दोघेही सुरक्षित रहाल. 

4. घर स्वच्छ ठेवा आणि बाहेरुन आणलेल्या वस्तू देखील साफ करुनच घरात आणा

5. नॉन व्हेज विशेषकरुन सी-फुड खाणे टाळा कारण कोरोना व्हायरस सी-फूडमुळेच पसरला आहे.

कोरोना व्हायरसपासून बरे होण्यासाठी अजूनतरी कोणतीही वॅक्सिन तयार झालेली नाही. या व्हायरसच्या उपचारासाठी वैज्ञानिक वॅक्सिन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. WHO ने चीनमधेये नवीन वर्षाच्या उत्साहामुळे तिथे येणा-या जाणा-यांची संख्या वाढणार आहे त्यामुळे संक्रमण वाढण्याची चिंता व्यक्त केली आहे. 

2019-nCoV शी संबधित माहिती आणि अपडेटवर Newschecker ची नजर आहे जर तुम्हाला या व्हायरस संबंधीत काही माहिती किंवा संशयित बातमी मिळाली तर ती आम्हाला शेअर करा – 

Email us at: checkthis@newschecker.in

WhatsApp us at: 9999499044

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular