After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Claim-
केरळ मधील चेरामन मशीद ही जगातील दुसरी सर्वात जुनी मशीद आहे. एका हिंदू राजाने मंदिराचे रुपांतर या मशिदीत केले. तर बाबराने श्रीरामाच्या जन्मस्थानावरील पवित्र हिंदू मंदिर उद्ध्वस्त करुन मशीद बांधली पण हिंदू असहिष्णू आणि मुसलमान पिडित आहेत.
Verification
Aviral Sharma नावाच्या ट्विटर हॅंडल वर एक ट्विट करण्यात आले आहे. यात जगातील सर्वात जुनी ही मशीद ही केरळमधील चेरामन मशीद आहे एका हिंदू राजा ने ही मशीद बांधली असून यासाठी एका मंदिराचे रुपांतर या मशीदीत केले पण बाबराने हिंदू मंदिर उद्ध्वस्त करुन मशीद तयार केली.
आम्ही ट्विटमध्ये केलेल्या दाव्याची पडताळणी सुरू केली. गुगलमध्ये काही किवर्ड्स मदतीने शोध घेतला असता काही परिणाम समोर आले.
याचदरम्यान आम्हाला अज जजीरा नावाच्या वेबसाईटवर एक लेख मिळाला यात या मशिदीच्या इतिहासाबद्दल माहिती देण्यात आली आहे. केरळच्या राजाने धर्मवपरिवर्तन करुन इस्लाममध्ये प्रवेश केला तो मक्केला गेला मात्र तेथून परत येत असताना त्याचा प्रवासा दरम्यान मृत्यू झाला पण मृत्यू आधी त्याने भारतात पहिली मशिद बांधण्याचे आदेश दिले। त्याच्या इच्छेनुसार ही मशिद बांधण्यात आली.
मशिदीविषयी आणखी माहिती मिळवण्याकरिता शोध सुरू ठेवला असता बीबीसीच्या वेबसाईटवर एक लेख मिळाल। या लेखानुसार धर्मनिरपेक्ष विचारधारेसाठी प्रसिद्ध मशिदील तेथील राजा चेरामन पेरुमलचे नाव देण्यात आले आहे. स्थानिक मान्यतेनुसार राजाने इस्लाम धर्माचा स्विकार केला होता आणि त्याच्या आदेशानेच या मशिदीचे बांधकाम करण्यात आले। या लेखात कुठेही मंदिराचे रुपांतर मशिदीत केल्याचा उल्लेख नाही.
याशिवाय आम्हाला एनडीटिव्हीचा लेख मिळाला ज्यात म्हटले आहे की, कोडुंगलुर किंवा क्रॅंगनोर नावाच्या शहरातील चेरामन जुम्मा मशिद ही भारतातीलच नाही तर या उपमहाद्विपातील सर्वात जुनी मशिद आहे. ही हजरत मोहम्मदांच्या काळातील आहे. या मशिदीचे बांधकाम इस्लाम धर्माचे प्रचारक मलिक डुबन दिनार यांनी 629 इसवीमध्ये केले होते. असे म्हटले जाते कि चेर वंशाचा शेवटचा राज्यकर्ता चेरामन पेरुमल आधिपत्याखाली या मशिदीचे बांधकाम झाले होते. त्याच्याबाबतीत म्हटले जाते कि चेरामन पेरुमलने मक्केमध्ये पैगंबराची भेट घेतल्यानंतर राज्याचा त्याग करुन इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. भारतात परतत असताना ओमानच्या धुफार शहरात आजारामुळे त्याचे निधन झाले मात्र मृत्यूआधी त्याने स्थानिक क्षेत्रपांना राज्य सोपवले आणि त्यांना पत्र लिहून अरबमधून येणा-या काही व्यापा-याना सर्व प्रकारची मदत करण्याची विनंती केली होती.
बाबराने हिंदू मंदिर उद्ध्वस्त करुन मशिद बांधल्याचा दावाही या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. आम्ही याबाबतही पडताळणी केली असता बाबरी मशिद आणि रामजन्मभूमीच्या वादाचे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या विचाराधीन असल्याचे आज तक या वृत्तवाहिनीच्या बातमीमुळे समोर आले. बातमीनुसार या प्रकरणाचा लवकर निकाल लागण्याची शक्यता आहे.
यावरुन स्पष्ट होते की केरळमधील हिंदू राजा चेरामन याने धर्मांतरण करुन इस्लामचा स्वीकार केला होता. यानंतरच देशातील पहिली मशिद बांधली गेली. कोणतेही मंदिर उदध्वस्त करुन नाही तर मंदिराच्या शैलीनुसार या मशिदीचे बांधकाम करण्यात आले.
Tools Used
- Twitter Advanced Search
- Google keywords Search
Result- Misleading
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.