After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Claim– आज सिंगापूरमध्ये कोरोनाव्हायरस मुळे एका मुलीचा मृत्यू झाला, मित्रांनो हा व्हायरस किती धोकादायक आहे हे व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल.
Verification–
सोशल मीडियामध्ये सध्या कोरोना व्हायरसबद्दल अनेक पोस्ट पहायला मिळत आहेत. अशीच एक पोस्ट आम्हाला फेसबुक आढळून आली. या पोस्टमध्ये एक वीडियो शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी सुपर स्टोअरमध्ये सामान घेत असताना अचानक चक्कर येऊन पडते हा सगळा प्रकार स्टोअरमधील सीसीटीव्ही कॅमरे-यात कैद होतो. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की,, आज सिंगापुरमध्य्ये कोरोना व्हायरसमुळ एका मुलीचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हायरस किती धोकादायक आहे हे तुमच्या लक्षात येईल.
आम्ही या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून काही स्क्रीनशाॅट काढले आणि गूगल रिव्हर्स इमेजच्या माध्यमाने शोध सुरु केला असता आम्हाला अनेक बातम्यांचे परिणाम आढळून आले. यात
hmetro.com नावाच्या वेबसाइटवर ही संबधित युवतीचा फोटो असलेली बातमी आढळून आली. या बातमीत नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही गूगल ट्रांसलेटची मदत घेतली. बातमीत दिलेल्या माहितीनुसार मलेशियातील उतामा या शहरातील शहा आलम शाॅपिगं सेंटरमध्ये 26 जानेवारी रोजी 20 वर्षीय नूर अज्जा इज्जती नावाच्या युवतीचा मोबाईल एसेसरी खरेदी करताना चक्कर आल्याने मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमरे-यात कैद झाली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियात कोरोना व्हायरस मुळे मृत्यू झाल्याच्या दाव्याने व्हायरल झाला. यावर तिचे वडील नाॅरज्लान मोखरी (वय 47) यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की माझ्या मुलीचा मृत्यू हा कोरोना व्हायरस मुळे झालेला नाही. कोणत्याही पडताळणीशिवाय हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामुळे आम्ही निराश आहोत.
याशिवाय या मुलीचा अंत्यविधी केल्याची व अफवा न पसवण्याची विनंती करणारी एक पोस्ट देखील फेसबुकवर आढळून आली. याच म्हटले आहे की माझ्या पुतणीचा मृत्यू कोरोना व्हायरस मुळे झालेला नाही. आम्ही या अफवांमुळे निराश आहोत.
मलेशियन सरकारने याबाबत काही माहिती दिली आहे का याबद्दल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथील आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटर हॅंडलवर आम्हाला एक ट्विट आढळून आले. यात म्हटले आहे की व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियातून हटवण्यास सांगण्यात आले आहे. मलेशियात खोट्या बातम्या पसरविणे थांबवा.
याशिवाय मृत युवतीच्या मित्राने देखील तिचे पोस्टमार्टम रिपोर्ट्स ट्विटर शेअर करुन भ्रामक पोस्ट व्हायरल न करण्याचे आवाहन देखील केले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते व्हायरल व्हिडिओ सिंगापूरमधील नसून मलेशियातील आहे आणि यातील युवतीचा मृत्यू हा कोरोना व्हायरसमुळे झालेला नाही. सोशल मीडियात खोट्या दाव्याने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Sources
Facebook Search
Twitter Advanced Search
Google Reverse Image
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.