Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeCoronavirusसोलापुरात महिलेने मुलांसह आत्महत्या केलेली नाही, खोटा दावा व्हायरल

सोलापुरात महिलेने मुलांसह आत्महत्या केलेली नाही, खोटा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim- लाॅकडाऊनदरम्यान रेशन न मिळाल्याने सोलापूमध्ये एका महिलने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. 

सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक महिला आणि दोन लहान मुले घरात गळाफासावर लटकल्याचे दिसत आहे. या व्हिडिओविषयी दावा करण्यात येत आहे की, सोलापूरमध्ये रेशन मिळाल्याने एका महिलेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. 

Verification- आम्ही या बाबत पडताळणी सुरु केली. याबाबत काही किवर्ड्सच्या आधारे शोध सुरु केला असता आम्हाला हा व्हिडिओ याच दाव्याने फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून आले. 

https://www.facebook.com/keshavnath.salve/videos/2603854976499519

अर्काईव्ह

https://www.facebook.com/arjunraj.bagal.5/videos/2517220405206766

अर्काईव्ह

https://www.facebook.com/simran.saqlaini/videos/3755858037817990

अर्काईव्ह

सोलापूरमध्ये रेशन न मिळाल्याने महिलेने आपल्या दोन मुलांसह गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी मुख्य प्रवाहातील माध्यमांत नसल्याने आम्ही ही घटना नेमकी कुठली आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओमधून काही स्क्रिशशाॅट्स घेतले आणि गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्यानेे शोध सुरु केला. या शोधा दरम्यान युटूयबवर हा व्हिडिओ आढळून आला तो बांग्लादेशी भाषेतील होता आणि एक महिन्यापूर्वी अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे की, लाॅकडाऊनमध्ये अन्न न मिळाल्याने महिलने मुलांसह आत्महत्या केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=00KGmfTp7N4

हा व्हिडिओ बांग्लादेशातील एका फेसबुक पेजवर महिन्यापूर्वी अपलोड करण्यात आला आहे. 

https://www.facebook.com/watch/?v=3317875881566505

याशिवाय या व्हायरल व्हिडिओविषयी सोलापूरमधील विजापूर नाका पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी माहिती दिल्याचा व्हिडिओ आम्हाला मिळाला. यात त्यांनी सांगितले आहे की,सोशल मीडियात खोटी माहिती दिली जात आहे, हा व्हिडिओ सोलापूरमधील नाही. विजापूर नाका परिसरात अशी घटना घडलेली नाही.

https://www.youtube.com/watch?v=icnOFsjHPSI

यावरुन हेच स्पष्ट होते की. रेशन न मिळाल्याने उपासमारीमुळे सोलापुरात महिलेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याची बातमी असत्य आहे. व्हायरल व्हिडिओ हा सोलापुरातील नाही. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याविषयी देखील माहिती मिळालेली नाही.
Source
Facebook, Google Search, Youtube
Result- Misleading/ somewhat false 

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular