Wednesday, May 22, 2024
Wednesday, May 22, 2024

HomeCoronavirusपरप्रांतियांनी अन्नाची पाकिटे फेकल्याचा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही, वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

परप्रांतियांनी अन्नाची पाकिटे फेकल्याचा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही, वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

Authors

Claim-  परप्रांतियांसाठी सोडलेल्या रेल्वेतून प्रवाशांनी अन्नाची पाकिटे फेकून मुर्दाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ महाराष्ट्रातील आहे.

सोशल मीडियामध्ये रेल्वे प्लॅटफाॅर्मवर अन्नाची पाकिटे फेकल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याविषयी दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ लाॅकडाऊनमध्ये महाराष्ट्रातून परप्रांतियांसाठी सोडण्यात आलेल्या रेल्वेचा आहे. यात म्हटले आहे की, परप्रांतियांना यांच्या घरी सुखरूप जाण्याकरिता गाड्यांची सोय केली, स्टेशनपर्यंत पोहचवले. गाडीत बसून देताना प्रत्येकाला जेवणाचे डबे व पाण्याचा बाटल्या देण्यात आल्या मात्र सर्वांनी जेवण, पाण्याच्या बाटल्या प्लेटफार्मवर फेकले आणि मुर्दाबाद घोषणा दिल्या.

 Verification-  आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. गूगलमध्ये काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता फेसबुकवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे आढळून आल्या. सर्व पोस्टमध्ये हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

https://www.facebook.com/deoren1/videos/2243066475818535

अर्काईव्ह

https://www.facebook.com/441659492938948/videos/234462694642010

अर्काईव्ह

आम्ही व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून परप्रांतियांसाठी सोडलेल्या रेल्वे स्थानकाचा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये महाराष्ट्रात प्रवाशांनी अन्न फेकल्याची बातमी आढळून आली नाही. आम्ही हा व्हिडीओ बारकाईने पाहिला असता प्लॅटफार्म वर आसनसोल जंक्शन लिहिलेल्या बोर्ड आढळून आला.

हे रेल्वे स्टेशन नेमके कुठे आहे याचा शोध घेतला असता पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात हे स्टेशन असल्याची माहिती मिळाली. यानंतर आम्ही काही किवर्ड्सचा वापर करत याबद्दल शोध सुरु केला असता. आम्हाला In Khabar या व्हिडिओ चॅनलवर हा व्हिडिओ आढळून आला. यात म्हटले आहे की केरळमधून बिहार येथील दानापूर येथे मजुरांना घेऊन चालेल्या स्पेशल ट्रेनचा हा व्हिडीओ आहे. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील आसनसोल रेल्वे स्टेशनवर 4 मे रोजी पोहचली असता. मजुरांना अन्नाची पाकिटे देण्यात आली मात्र हे अन्न शिळे असल्याने त्यांनी ते प्लॅटफाॅर्मवर फेकून दिले आणि मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्या. 

टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने देखील याबाबत वृत्त दिले आहे.

याशिवाय आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर देखील ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. 

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ हा महाराष्ट्रातील नसून पश्चिम बंगालमधील आसनसोल रेल्वे स्टेशनचा आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे. 
Source
Facebook Search, Google Search 
Result- Misleading/ partlyFalse


(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular