Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
लिंबाचा रस नाकात सोडल्याने कोरोना नष्ट होत असल्याचा दावा आंध्रप्रदेशातील रंगा व्यंकेटेश्वर राव यांनी केल्याची बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. बातमीनुसार राव यांच्या दावा आहे की, कोरोना फक्त एक रुपयात नष्ट होऊ शकतो. राव यांनी सांगिलेली कृती केल्यानंतर कोरोना नाही गेला तर पाच लाखांची भरपाई देखील ते देणार असल्याचा उल्लेख बातमीत करण्यात आला आहे. याच बातमीचे कात्रण व्हायरल होत आहे.
लोकाशा नावाच्या वर्तमानपत्राच्या बातमीचे कात्रण सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म फेसबुवक शिवाय व्हाट्सअप्प वर देखील व्हायरल होत असल्याचे आढळून आले.
लोकाशा न्यूज च्या बातमीचा शोध घेतला असता आम्हाला lokashanews.com या वेबसाईटवर ही बातमी आढळून आली (संग्रहित).
बातमीत काय म्हटले आहे ?
ही बातमी वाचल्यानंतर आम्ही रंगा राव कोण आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला रंगा व्यंकश्वेर राव यांचे एक फेसबुक प्रोफाईल आढळून आले. फेसबुक पेजवर मिळालेल्या माहितीनुसार राव 2018- 19 मध्ये आंध्र प्रदेशातील निदादावोल येथील लायन्स क्लबचे अध्यक्ष होते. मात्र त्यांच्या प्रोफाइल वर कुठेही राष्ट्रपदी पदकाने सन्मानित करण्यात आल्याचे म्हटलेले नाही. मात्र त्यांनी लिंबाच्या रसाचा दावा आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.
आम्ही लिंबाच्या रसाने खरंच कोरोना नष्ट होतो का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला अमेरिकेतील नॅशनल अकॅडमिक्स ऑफ सायन्सेस इंजिनीअरिंग मेडिसिन या संस्थेच्या वेबसाईटवर हा दावा चुकीचा असल्याची माहिती मिळाली.
अधिक शोध घेतला असता आम्हाला रंगा व्यंकटेश्वर राव यांनी न्यूजमीटर या इंग्रजी फॅक्टचेकिंग वेबसाईटला दिलेली प्रतिक्रिया आढळून आली. यात त्यांनी म्हटले आहे की, “लिंबाच्या रसाचा उपाय कोव्हीड-19 च्या रुग्णांसाठी नाही, त्यांनी हा उपाय करावा असा सल्लाही मी कधी देणार नाही.”
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की लिंबाच्या रसाने कोरोना नष्ट होत असल्याचा दावा अशास्त्रीय आहे. त्याला कोणताही ठोस आधार नाही. सोशल मीडियात हाच चुकीचा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Result- False
Sources
Newsmeter- https://newsmeter.in/fact-check-no-lemon-juice-is-not-cure-for-covid-19/
nationalacademies- https://sites.nationalacademies.org/basedonscience/Lemon-juice-does-not-cure-COVID-19/index.htm
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.