Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
कंगना रानौतने कपिल शर्माच्या शोचा बहिष्कार केल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये कंगनाच्या ट्विटचा स्क्रीनशाॅट शेअर करण्यात आहे. यात कंगना कंपिला शर्माच्या शो चा बहिष्कार करताना दिसत आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी कपिल शर्माच्या शोचा पूर्ण बहिष्कार करते, कारण सलमान खान त्याचा प्रोड्युसर आहे.
Fact Check/Verification
कंगना रानौतने खरंच कपिल शर्मा शो बहिष्कार करणार असल्याचे ट्विट केले आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आम्ही व्हायरल स्क्रीनशाॅटमधील कंगनाचे ट्विटर अकाउंट पडताळून पाहण्याचे ठरविले. मात्र आम्हाला त्या नावाचे ट्टिटर अकाउंट डिलीट करण्यात आल्याचे आढळून आले.
यानंतर आम्ही शोध पुढे सुरुच ठेवला असता व आम्हाला कंगणाचे आॅफिशिअल ट्विटर अकाउंट आढळून आले आम्ही या अकाउंटवरील मागील दोन महिन्याचे ट्विट पाहिले मात्र यात कुठेही कपिलच्या शो चा बहिष्कार करणारे ट्विट आढळून आले नाही.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, कंगणा रानौतने कपिल शर्माच्या शो चा बहिष्कार केला असल्याचे टविट केलेले नाही. सोशल मीडियात फेक ट्विट व्हायरल झाले आहे.
Result- False
Sources
ट्विटर- https://twitter.com/KanganaTeam
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.