Thursday, May 30, 2024
Thursday, May 30, 2024

HomeFact Checkलिफ्टमध्ये महिलेला मारहाणीचा व्हिडिओ दिल्ली मेट्रोचा नाही, हे आहे सत्य

लिफ्टमध्ये महिलेला मारहाणीचा व्हिडिओ दिल्ली मेट्रोचा नाही, हे आहे सत्य

Authors

लिफ्टमध्ये महिलेला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोचा आहे. व्हायरल होत असलेल्या 56 सेंकदाच्या या व्हिडिओत एक महिला लिफ्ट मध्ये प्रवेश करते व तिच्यापाठोपाठ एक पुरुष देखील लिफ्टमध्ये शिरतो. लिफ्ट सुरु होताच तो पुरुष महिलेल्या लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात करतो. ती त्याचा प्रतिकार करु शकत नाही. तो तिच्या हातातील पर्स हिसकावून घेताना दिसतो. तिने विरोध करताच त्याच पर्सने तिला मारहाण करतो व नंतर तीच पर्स घेऊन पसार होतो हा सगळा प्रकार लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद होतो. हे फुटेज व्हायरल झाले असून दावा करण्यात येत आहे की, हा सगळा प्रकार दिल्ली मेट्रोच्या लिफ्टमध्ये घडला आहे. अशा गुन्हेगारांना जेलमध्ये ठेवायला हवे. जोपर्यंत समाजात असे रावण जिवंत आहेत. आमच्या बहिणींना स्वतः दुर्गा बनावे लागेल. काॅंग्रेस नेत्यापासून अनेक यूजर्सनी सोशल मीडियात हाच दावा केला आहे.

https://www.facebook.com/RGFCDelhi/videos/364469651466407
https://twitter.com/ashokbasoya/status/1320310995995271168

संग्रहित

Fact Check/Verification

व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि ही घटना कधीची आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता. काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला मात्र हा याबाबत अधिक माहिती मिळाली नाही, मात्र गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध सुरु केला असता यासंदर्भात अनेक बातम्या आढळून आल्या.

Thestar.com या वेबसाईटवर जून 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीत म्हटले आहे की , मलेशियातील क्वालंलापुर येथील एमआरटी (मेट्रो) लिफ्टमध्ये महिलेल्या मारहाण करुन पर्स पळविणा-या गुन्हेगाराला 18 वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात आली आहे.

अधिक शोध घेतला असता आम्हाला 16 फेब्रुवारी 2019 रोजी युटयूबवर अपलोड कऱण्यात आलेला व्हायरल व्हिडिओ आढळून आला. यात देखील ही घटना क्लाललांपुरमधील चेरास एमआरटी येथील असल्याचे म्हटले आहे.

अधिक शोध घेतला असता asiatimes.com या वेबसाईटवर 18 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली, ज्यात म्हटले आहे की, क्वालालंपूरच्या मधील चेरास जिल्ह्यातील मास रॅपिड ट्रान्झिट स्थानकात गुरुवारी सकाळी एका 48 वर्षीय महिलेला लिफ्टच्या आत दरोडेखोराने बेदम मारहाण केली. महिला लिफ्टमध्ये एकट्याने शिरली त्यांनंतर एक पुरुष तेथे आला त्याने मारहाण करत पर्स लांबविली, क्वालांलपूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रमुखांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 56 सेंकदाचा सगळा प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, महिलेला लिफ्टमध्ये मारहाणीचा व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधील नसून मलेशियाची राजधानी क्वालांलपूर येथील असून तो मागील वर्षीचा आहे. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Result: Misleading

Our Source

asiatimes.com- https://asiatimes.com/2019/02/woman-beaten-robbed-in-kuala-lumpur/

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular