Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact CheckPoliticsमहाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अर्जातून 'हिंदू' शब्द हटविल्याचा दावा, हे आहे सत्य

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अर्जातून ‘हिंदू’ शब्द हटविल्याचा दावा, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अर्जातून ‘हिंदू’ शब्द हटविल्याचा दावा व्हायरल झाला आहे. तसेच ठाकरे सरकारने शिक्षण मंडळाच्या फाॅर्ममधून हिंदू शब्द हटविल्याच्या काही बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. याशिवाय भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, ठाकरे सरकारने हिंदुत्व सोडले, आता हिंदू शब्दावरही चौकट मारली. यांचा निलाजरे पणा पाहा 10 वी, 12 वी परीक्षेच्या फॉर्मवर हिंदू शब्द न वापरता नॉन मायनोरिटी हा शब्द वापरला आहे.

संग्रहित

याशिवाय आम्हाला www.performindia.com या वेबसाईटवर देखील या संदर्भात बातमी आढळून आली. यात देखील ठाकरे सरकारने राज्य शिक्षण मंडळाच्या

Fact check / Verification

यंदा होणा-या परीक्षांच्या अर्जातून हा हिंदू शब्द हटविण्यात आला आहे का किंवा हिंदू धर्माचा विशेष उल्लेख आहे म्हणून हा शब्द हटविण्यात आला आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. याबाबत आम्ही अधिक तपास सुरु केला असता आम्हाला दैनिक लोकमतची 3 डिसेंबर रोजीची बातमी आढळून आली यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या अर्जामध्ये 2014 पासूनच मायनाॅरिटी आणि नाॅन मायनाॅरिटी रिलिजन असे रकाने ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. नाॅन मायनाॅरिटीमध्ये, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन यांचा उल्लेख केला आहे.

अधिक शोध घेतला असता सप्टेंबर 2013 मध्ये प्रसिद्ध झालेली टाईम्स आॅफ इंडियाची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, दहावी, बारावीच्या परीक्षा अर्जात मायनाॅरिटी रकाना जोडण्यात येणार आहे.

राज्याता 2014 ते 2019 पर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे युतीचं सरकार होतं. या कालावधीत वरील देखील राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी बारावी परीक्षांच्या अर्जात व्हायरल दाव्यातील दोन्ही पर्याय तसेच ठेवण्यात आले होते. त्यामुळे आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारने हिंदू शब्द हटविल्याचा दावा खोटा असल्याचे सत्य समोर आले.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, दहावी, बारावीच्या अर्जातील बदल हा आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील नसून 2014 साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं युतीचं सरकार होते त्यावेळचा आहे.

Result -Misleading

Our sources

लोकमत- https://www.lokmat.com/maharashtra/excluded-word-hindu-examination-form-explanation-given-board-education-a580/

टाईम्स आॅफ इंडिया – https://timesofindia.indiatimes.com/home/education/news/SSC-HSC-pupils-can-mention-minority-status-in-exam-forms/articleshow/22242455.cms

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular