Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
पोलिस सीसीटिव्ही कॅमेरा तोडत असल्याचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनादरम्यानचा असल्याचा दावा व्हायरल झाला आहे. सोशल मीडियात शेअर होत असलेल्या या व्हिडिओत काही पोलिस काठीने उंचावर लावण्यात आलेला सीसीटिव्ही कॅमेरा काठीने फोडत असल्याचे दिसत आहे. तर व्हिडिओ बनिवणारा व्यक्ती पोलिस आपला कारनामा लपविण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरा तोडत आहेत असे हिंदीत सांगत आहे. तसेच तो कॅमेरा का तोडत आहात, चोर आहात का असा प्रश्न देखील विचारत आहे. दावा करण्यात येत आहे की 26 जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षावेळचा हा व्हिडिओ आहे.
Fact Check / Verification
व्हायरल होत असेला व्हिडिओमधून आम्ही काही किफ्रेम्स काढल्या व इनव्हिडच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला असता आम्हाला NYOOOZ TV या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ आढळून आला. दिल्ली हिंसाचारदरम्यान खुरेजी खास येथे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा तोडला असे याच म्हटले आहे हा व्हिडिओ 26 फेब्रुवारी 2020 रोजीचा आहे. सीएए वरुन दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारादरम्यान पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेरा तोडल्याचे व्हिडिओत म्हटले आहे.
याशिवाय हा आम्हाला हा व्हिडिओ लाॅजिकल इंडियन या फेसबुक पेजवर देखील आढळून आला. यात देखील हा व्हिडिओ दिल्ली हिंसाचारावेळचा असल्याची माहिती मिळाली.
याशिवाय क्विंट या वेबसाईटने देखील याची बातमी 26 फेब्रुवारी 2020 रोजी प्रकाशित केली होती तसेच पोलिस सीसीटिव्ही कॅमेरा तोडत असल्याचा फोटो देखील छापला होता.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, दिल्ली पोलिस सीसीटिव्ही तोडतानाचा व्हिडिओ 26 जानेवारी 2021 रोजीच्या शेतकरी आंदोलनादरम्यानाचा नाहीत र 11 महिन्यांपूर्वी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारा दरम्यानचा आहे.
Result – Misleading
Our Sources
The quint- https://www.thequint.com/news/india/video-shows-police-breaking-cctv-after-clearing-khureji-protest
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.