दिल्लीतील ट्रॅक्टर परेडच्या वेळी लाठीचार्जमुळे एक शेतकरी गंभीररित्या जखमी झाल्याचा फोटो सोशल मीडियात शेअर होत आहे. इंग्रजीत असलेल्या या दाव्याचा आम्ही अनुवाद केला. यात म्हटले आहे की, दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे एक आंदोलक शेतकरी गंभीररित्या जखमी झाला आहे. फोटोतील व्यक्तीच्या पाठीवर जखमा झाल्याचे दिसत आहेत.



Fact Check / Verification
व्हायरल फोटो दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलक शेतक-याचा आहे का याचा शोध घेण्यास आम्ही सुरुवात केली. मुख्य प्रवाहातील माध्यमांत व्हायरल फोटोतील शेतक-याची बातमी आढळून आली नाही. त्यामुळे शोध पुढे चालूच ठेवला असता अकाली दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते मनजिंदर सिंग सिरसा यांचे 16 जून 2019 रोजीचे ट्विट आढळून आले. यात व्हायरल फोटो शेअर केला आहे. सिरसा यांनी पंंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तसेच दिल्ली पोलिसांना यांना टॅग करुन पोलिसांना निष्पाष लोकांना अशा प्रकारे अमानुष मारहाण करण्याची परवानी मिळाली आहे का असा प्रश्न विचारला आहे.
याशिवाय अंकित लाल यांचे देखील 17 जून 2019 रोजीचे एक ट्विट आढळून आले ज्यात व्हायरल फोटो शेअर करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, ग्रामीण सेवा ड्रावरला दिल्ली पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे त्याचा शरीरावर अशा जखमा झाल्या आहेत.
यावरुन हे स्पष्ट झाले की व्हायरल फोटो 26 जानेवारी रोजीच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यानचा नाही पण नेमके काय प्रकरण आहे याचा अधिक शोध घेण्यास सुरुवात केली. असता आम्हाला newsroompost या वेबसाईटवर आम्हाला एका बातमीत हा फोटो आढळून आला. यात म्हटले आहे की, ग्रामीण सेवा ड्रायव्हर मारहाण प्रकरणी दिल्लीचे पोलिस उपायुक्त विजयंता आर्या यांनी असिस्टंड पोलिस सब इन्स्पेक्टर संजय मलिक, देवेंद्र आणि काॅन्स्टेंबल पुष्पेंद्र यांना निलंबित केले आहे.

Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल फोटोतील व्यक्तीला दिल्ली पोलिसांकडून दिड वर्षापूर्वी मारहाण करण्यात आली होती. 26 जानेवारी रोजी शेतक-याला मारहाण झाल्याचा दावा खोटा आहे.
Result – Misleading
Our Sources
Newsroompost – https://newsroompost.com/india/delhi-police-institutes-enquiry-into-auto-driver-thrashing-incident/455912.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.