Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
ज्येष्ठ समाजसेववक अण्णा हजारे यांनी भाजपात प्रवेश केला असल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात भाजप नेते जे. पी नड्डा आणि अण्णा हजारे यांचा हा फोटो असून यात अण्णांनी भारतीय जनता पार्टीचे उपरणे गळ्यात अडकविले असल्याचे दिसत आहे. त्यांच्या नावाचे भाजप प्रवेशाचे एक ट्विट देखील आढळून आले आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी 30 जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली असता त्यांनी आपल्या उपोषण स्थगित केले. मात्र यानंतर सोशल मीडियावर अण्णांवर टीका सुरु झाली आहे. अशातच हा फोटो व्हायरल झाला आहे.
Fact Check / Verification
अण्णा हजारे यांनी खरंच ट्विट करुन भाजपात प्रवेश केल्याची माहिती दिली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला ज्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करण्यात आले आहे ते अकाउंट अण्णांचे अधिकृत अकाउंट नसून पॅरोडी अकाउंट असल्याचे आढळून आले.
यानंतर आम्ही अण्णा हजारे आणि जे.पी नड्डा यांच्या फोटोचे नेमके काय सत्य आहे हे पडताळून पाहण्यासाठी व्हायरल फोटो रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला टाईम्स ऑफ इंडिया च्या 11 मार्च 2020 रोजीच्या बातमीत मूळ फोटो आढळला. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.
तोच फोटो एडिट करुन अण्णा हजारे यांचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आला व तो सध्या त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर भाजप प्रवेशाच्या दाव्याने व्हायरल करण्यात येत आहे.
आपण व्हायरल आणि टाईम्स आॅफ इंडियाच्या बातमीतील मूळ फोटोची तुलना खाली पाहू शकता.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाचा फोटो एडिट करुन अण्णा हजारे यांनी भाजप प्रवेश केला आहे असे भासविण्यात आले आहे.
Result: Manipulated Media
Our Sources
टाईम्स आॅफ इंडिया- https://timesofindia.indiatimes.com/india/jyotiraditya-scindia-joins-bjp-in-presence-of-jp-nadda/articleshow/74575197.cms
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.