Monday, December 9, 2024
Monday, December 9, 2024

HomeFact CheckFact Check: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्रौपदी मुर्मू ना प्रधानमंत्री म्हटलं? अर्धा व्हिडीओ...

Fact Check: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्रौपदी मुर्मू ना प्रधानमंत्री म्हटलं? अर्धा व्हिडीओ शेयर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

Claim
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रधानमंत्री म्हटले.

Fact
हा दावा अर्धा व्हिडीओ शेयर करून दिशाभूल करण्यासाठी केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली झालेली चूक तात्काळ सुधारली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख प्रधानमंत्री असा केला आहे. असा दावा एक व्हिडीओ शेयर करून केला जात आहे. ” ब्रकिंग न्युज एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी केली. प्रधानमंत्री पदावर द्रोपदी मुर्मू यांची नुकतीच निवड करण्यात आली. @mieknathshinde उगच बाळासाहॆबांची दिघॆ साहॆबांची इज्जत नका काढू” अशा कॅप्शन खाली हा दावा व्हायरल केला जात आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Screengrab of Whatsapp Tipline

अनेक युजर्सनी फेसबुक आणि ट्विटर वर हा दावा मोठ्याप्रमाणात शेयर केला आहे. तसेच मिम्स च्या माध्यमातून व्हाट्सअप वरही हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल करण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Viral Video

” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान आणि राष्ट्रपती हेच माहीत नाही…. मुख्यमंत्र्यांचे ज्ञान बघता राज्याच्या विकासाचे तीन/ तेरा वाजणार….” अशा कॅप्शनखाली हा व्हिडीओ व्हाट्सअप वर फिरू लागला आहे.

Fact check/ Verification 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे व्हायरल होत असलेल्या दाव्याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. की वर्ड सर्च च्या माध्यमातून आम्ही शोधले असता, ‘एकनाथ शिंदे द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री’ अशा शब्दांच्या शोधातून पाहताना आम्हाला दैनिक सामना ने ११ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध केलेले एक वृत्त सापडले.

Fact Check: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्रौपदी मुर्मू ना प्रधानमंत्री म्हटलं? अर्धा व्हिडीओ शेयर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
Screengrab of Saammana.com

या बातमीच्या शीर्षकात “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गोंधळले, द्रौपदी मुर्मू ना म्हटले प्रधानमंत्री” असा उल्लेख आहे. मात्र वृत्तात पुढे, ” एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती एकनाथ शिंदे यांना प्रधानमंत्री म्हटले, मात्र काही क्षणातच त्यांना त्यांची चूक लक्षात आली व त्यांनी ती सुधारली व राष्ट्रपती असे म्हटले” असा उल्लेख आढळला.

यावरून आम्ही पुढील शोध केला असता, आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाचा मूळ व्हिडीओ सापडला. @mieknathshinde या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर ब्रॉडकास्ट केलेला तो व्हिडीओ आम्हाला पाहायला मिळाला. या व्हिडिओत ६:३६ मिनिटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील विधान केल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. “अनेक उदाहरणे आपण आपल्या राज्यात नव्हे देशात पाहतोय, महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत. मग आता आम्ही पाहतोय की या आपल्या देशाच्या आता नुकत्याच पदभार सांभाळलेल्या प्रधानमंत्री द्रौपदीताई मुर्मू असतील” असे विधान त्यांनी केले. मात्र लागलीच त्यांना आपली चूक जाणवल्याने व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. थोडेसे थांबून ते पुन्हा ” राष्ट्रपती आपल्या द्रौपदीताई मुर्मू असतील” असे म्हणून पुढे आपले भाषण चालू ठेवतात. हे आम्हाला पाहायला मिळाले.

पालघर येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लाईव्ह” असे या व्हिडीओचे कॅप्शन आहे. पालघर येथे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष जाता न आल्याने मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून त्यात सहभाग घेऊन भाषण केल्याची माहिती आम्हाला मिळाली.

मुख्यमंत्र्यांच्या Eknath Shinde या युट्युब चॅनेलवर देखील हा व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे आम्हाला दिसून आले.

हा व्हिडीओ ११ मार्च २०२३ रोजी अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ७.०० मिनिटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख करताना केलेली चूक आणि त्यानंतर केलेली सुधारणा पाहायला मिळते.

आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाशीही संपर्क साधला. त्यांचे पीआरओ पात्रोडकर यांनी पालघर येथे शनिवार दि ११ मार्च २०२३ रोजी महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम झाला, असे सांगितले. तसेच मूळ व्हिडीओ आणि व्हायरल व्हिडीओ मधील फरक आमच्या निदर्शनास आणून दिला.

Conclusion

आमच्या तपासात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणातील मूळ व्हिडिओतील चूक सुधारल्याचे भाग वगळून व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: Missing Context

Our sources

News published by Saamana on March 11, 2023

Live Brodcast by @mieknathshinde on March 11, 2023

Video uploaded by Eknath Shinde youtube channel on March 11, 2023


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular