Monday, November 25, 2024
Monday, November 25, 2024

HomeCoronavirusपुण्यातील कमांड हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी पाच हजार बेड उपलब्ध? वाचा सत्य

पुण्यातील कमांड हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी पाच हजार बेड उपलब्ध? वाचा सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

लष्कराने पुण्यातील कमांड हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी पाच हजार बेड उपलब्ध करुन दिले असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सध्या पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांना बेड मिळविण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शिवाय पिंपरीत मोफत कोविड सेंटरमध्ये एका बेडसाठी एक लाख रुपये उकळल्याने काही डाॅक्टरांवर कारवाई देखील करण्यात आली होती. अशातच लष्काराने कमांड हाॅस्पिटलमध्ये 5000 बेड मोफत उपलब्ध करुन दिल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पुणे येथे कमांड हाॅस्पिटल मोफत उपचार देत आहे.इंडियन आर्मी हाॅस्पिटलने पुणे येथील लोकांसाठी 5000 बेड उपलब्ध करुन दिल्या आहेत. कृपया या क्रमांकावर 02026363901 वर काॅल करा. केवळ आधार कार्ड आवश्यक आहे. पुण्यातील कोणी बेड्स शोधत असतील तर ही पोस्ट सर्व ठिकाणी शेअर करा म्हणजे गरजुंना याचा लाभ मिळेल… धन्यवाद.”

संग्रहित

संग्रहित

Fact Check/Verification

पुण्यातील कमांड हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी पाच हजार बेड मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला दैनिक प्रभात च्या वेबसाईटवर 28 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली.

यात म्हटले आहे की, लष्कारातर्फे जुन्या कमांड हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचारासाठी मोठ्या क्षमतेने आरोग्य सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. पुण्याच्या जिल्हा वैद्यकीय अधिका-यांकडून पाठवण्यात आलेल्या नागरी रुग्णांवर उपचारासाठी या सुविधा उभारण्यात आल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस नैन यांनी 27 एप्रिल रोजी जुन्या कमांड हाॅस्पिटल संकुलाला भेट दिली. त्यांनी आरोग्य कर्मचा-यांशी संवाद साधला आणि महामारीविरोधात सुरु असलेल्या लढ्यात ते करीत असलेल्या समर्पित देशसेवेबद्दल त्यांच कौतुक केले.

मात्र या बातमीत कुठेही कमांड हाॅस्पिटलमध्ये 5000 मोफत बेड उपलब्ध करुन दिल्याची माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे आम्ही याबाबत अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला दैनिक प्रभातचीच 4 मे रोजीची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, “कमांड हाॅस्पिटलमध्ये पाच हजार बेड्सची सुविधा” ही अफवा आहे.

बातमीत म्हटले आहे की, कमांड हाॅस्पिटलमध्ये 5000 बेड्स असून तेथे कोरोना रुग्णांना दाखल करता येईल अशी पोस्ट काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल होत असून ती अफवा असल्याचे संरक्षण खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वास्तविकपणे असी कोणीही थेट कमांड हाॅस्पिटलमध्ये दाखल करुन घेण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. येथे रग्णांना तीन माध्यमांतून उपचारासाठी दाखल करता येणार आहे. यामध्ये महापालिकेचे आरोग्य प्रमुख किंवा महापालिकेच्या आपत्ती विभाग किंवा जिल्हा आरोग्य अधिका-यांची शिफारस येथे दाखल होण्यासाठी लागते. अशी माहिती संरक्षण खात्यातील जनसंपर्क अधिका-यांनी दिली असून व्हायरल अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे.

याशिवाय आम्हाला संरक्षण खात्याच्या जनसंपर्क अधिका-यांचे 4 मे रोजीचे ट्विट देखील आढळून आले. यात त्यांनी म्हटले आहे की, सोशल मीडिया द्वारे पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल सावध रहा असे म्हटले आहे व व्हायरल मेसेज खोटा असल्याचे सांगितले आहे.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, पुण्यातील कमांड हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी 5000 बेड्स लष्कराने उपलब्ध करुन दिल्याची अफवा सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. जुन्या कमांड हाॅस्पिटलमध्ये काही रुग्णांसाठी सुविधा उभारल्या आहेत मात्र त्यांना तेथे थेट दाखल करता येत नाही त्यासाठी महापालिका किेवा जिल्हा आरोग्य अधिका-याची शिफारस लागते.

Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?

Result: False

Claim Review:  पुण्यातील कमांड हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी पाच हजार बेड उपलब्ध
Claimed By: Social Media post
Fact Check: False

Our Sources

दैनिक प्रभात- https://www.dainikprabhat.com/pune-five-thousand-bed-facility-in-command-hospital-is-a-rumor/

https://www.dainikprabhat.com/construction-of-facilities-for-treatment-of-kovid-patients-at-old-command-hospital-by-army/

जनसंपर्क अधिकारी, संरक्षण खाते


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular