Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact Checkराज ठाकरे यांनी कंगना रानौतच्या समर्थनार्थ ट्विट केले? जाणून घ्या सत्य

राज ठाकरे यांनी कंगना रानौतच्या समर्थनार्थ ट्विट केले? जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सोशल मीडियात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या ट्विटचा स्क्रीनशाॅट व्हायरल झाला आहे. यात राज ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना रानौतच्या समर्थनार्थ हे ट्विट केले आहे तर करिना कपूरवर टिका केली आहे. हे ट्विट हिंदीत केले असून यात म्हटले आहे की, “कंगना जैसी बहादुर औरतें मिलती तो बाबर आगे न बढ़ पाता लेकिन अफ़सोस करीना जैसी ज्यादा मिली जो घुटने टेक के तैमूर पैदा करती रही” (मराठी अनुवाद-  कंगना सारख्या धाडसी स्त्रिया मिळाल्या असत्या तर बाबर पुढे जाऊ शकला नसता पण दुर्दैवाने करीनासारख्या जास्त मिळाल्या ज्या गुडघे टेकून तैमूरला जन्म देऊ लागल्या.)

अभिनेत्री कंगना रानौतला पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यांनतर तिने एका मुलाखतीत भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले असल्याच व खरे स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाल्याचे वक्तव्य केले. यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली. याच दरम्यान राज ठाकरेंच्या ट्विटचा स्क्रिनशाॅट व्हायरल झाला आहे.

हा दावा फेसबुकवर देखील मोठया प्रमाणात शेअर होत आहे.

Crowdtangle वर या दाव्याबाबत 2,197 इंट्रेक्शन्स आढळून आले आहेत तर जय भारत माँ या फेसबुक प्रोफाईलवरील पोस्टला सर्वाज जास्त 591 लाईक्स मिळाल्या आहेत.

Fact Check/Verification 

राज ठाकरेंनी खरंच कंगना रानौतच्या समर्थानार्थ ट्विट केले आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला यासाठी गूगल सर्च आधार घेतला. पण या संदर्भात आम्हाला कोणतीही मुख्य प्रवाहातील माध्यमांत बातमी आढळून आली नाही. यासाठी आम्ही पुढे शोध सुरुच ठेवला.

राज ठाकरेंच्या ट्विटर हॅंडलला भेट दिली मात्र तेथे आम्हाला कंगनाच्या समर्थनार्थ एकही ट्विट आढळून आले नाही.

यानंतर व्हायरल होत असलेल्या स्क्रिनशाॅट्मधील @iRajthackerey या ट्विटर हॅंडलचा शोध घेतला असता आम्हाला हे ट्विटरवर उपलब्ध नसल्याचे आढळून आले.

व्हायरल स्क्रिनशाॅटचे नेमके सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही राज ठाकरे यांचे पीए सचिन मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, राज ठाकरेंनी कंगनाच्या समर्थनार्थ ट्विट केलेले नाही. त्यांच्या नावाने कुणीतरी बनावट ट्विटर अकाउंट तयार केले होते. त्याची आम्ही सायबर विभागाकडे तक्रार केलेली आहे.

हे देखील वाचा : पेट्रोल पंपावर मोटारसायकलला आग लागल्याचा व्हिडिओ पुण्यातील आहे?

Conclusion

आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की, राज ठाकरे यांनी कंगना रानौतच्या समर्थानार्थ ट्विट केलेले नाही. त्यांच्या नावाने बनावट ट्विटचा स्क्रिनशाॅट सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Result: False

Our Sources

Raj Thackeray Twitter- https://twitter.com/RajThackeray

Direct contact

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular