Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckPaytm अॅप आॅनलाईन फ्राॅडच्या नावाखाली व्हायरल झाला स्क्रिप्टेड व्हिडिओ

Paytm अॅप आॅनलाईन फ्राॅडच्या नावाखाली व्हायरल झाला स्क्रिप्टेड व्हिडिओ

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Paytm अॅप आॅनलाईन फ्राॅडच्या नावाखाली स्क्रिप्टेड व्हिडओ व्हायरल झाला आहे.

Paytm अॅपद्वारे ऑनलाइन फसवणूक करताना एक मुलगी पकडल्याचा दावा करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

व्हिडिओमध्ये, एक मुलगी दुकानातून काही वस्तू खरेदी केल्यानंतर Paytm च्या मदतीने दुकानदाराला पैसे देते. त्यानंतर पेमेंट केल्याचे दुकानदाराला दाखवल जाते. तेवढ्यात एक माणूस तिथे येतो आणि मुलीचा मोबाईल तपासू लागतो आणि मुलगी फसवणूक करत असल्याचं सांगतो. या तरुणीने नंतर आपण ऑनलाइन फसवणूक करत असल्याचे कबूल केले.

ही व्हिडिओ क्लिप शेअर करताना एका यूजरने लिहिले की, ‘Paytm अॅप आॅनलाईन कशी फसवणूक केली जाते या व्हिडिओमध्ये पहा’.

वरील फेसबुक पोस्ट येथे पाहता येईल.

वरील फेसबुक पोस्ट येथे पाहता येईल.

वरील फेसबुक पोस्ट येथे पाहता येईल.

Crowdtangle टूलच्या मदतीने केलेल्या विश्लेषणानुसार, हा व्हिडिओ फेसबुकवर गेल्या 24 तासांत एकूण 84 वेळा पोस्ट केला गेला आहे, ज्यामध्ये एकूण 3920 इंट्रेक्शन आहेत.

Screenshot Of Crowdtangle

वरील पोस्ट ट्विटरवरही शेअर करण्यात आली आहे.

https://twitter.com/Nawabmalik_fan/status/1478608407582195712

वरील ट्विटचे संग्रहण येथे पाहिले जाऊ शकते.

25 डिसेंबर 2021 रोजी न्यूज18 ने प्रकाशित केलेल्या लेखानुसार, सायबर गुन्हेगारांनी बनावट Paytm अॅप आॅनलाईन लोकांकडून लाखो रुपये लुटले आहेत. हैदराबाद पोलिसांनी बनावट पेटीएम अॅपद्वारे ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या काही लोकांना अटक केली.

लेखानुसार, ‘Paytm अॅप आॅनलाईन संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये, दुकानातून एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर, त्या वस्तूची रक्कम, दुकान किंवा दुकानदाराचे नाव आणि इतर माहितीसह बनावट स्लिप दाखवून दुकानदाराला लुटले जात आहे. हे बनावट अॅप दुकानदाराला पैसे मिळाल्याचेही दाखवते, मात्र त्यांच्या बँक खात्यात काहीही जमा होत नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, Paytm अॅप आॅनलाईन माध्यमातून एक मुलगी ऑनलाइन फसवणूक करताना पकडली गेली आहे.

Fact Check/Verification

Paytm अॅप आॅनलाईन एका मुलीने फसवणूक केल्याच्या दाव्यासह व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही इनव्हीड टूलच्या मदतीने काही की-फ्रेममध्ये रूपांतरित केले. यानंतर रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला, परंतु आम्हाला या व्हिडिओशी संबंधित कोणताही रिपोर्ट सापडला नाही.

त्यानंतर आम्ही कीफ्रेमसह काही कीवर्ड वापरून गुगलवर शोधण्यास सुरुवात केली, परंतु या प्रक्रियेदरम्यान आम्हाला या व्हिडिओशी संबंधित कोणताही रिपोर्ट सापडला नाही.

Paytm अॅप आॅनलाईन

त्यानंतर आम्ही Paytm अॅप आॅनलाईन कीवर्ड वापरून फेसबुकवर शेअर केलेले व्हिडिओ शोधू लागलो. दरम्यान आम्हाला NS KI DUNIYA ने 4 जानेवारी 2022 रोजी पोस्ट केलेला व्हिडिओ सापडला. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर, असे आढळून आले की हा तोच व्हिडिओ आहे जो ‘Paytm अॅपद्वारे ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या मुलीला पकडले’ असा दावा करत आहे.

प्राप्त व्हिडिओमध्ये 8 मिनिटे 39 सेकंदांदरम्यान एक व्यक्ती असे म्हणताना दिसत आहे की, ‘मित्रांनो, योग्य माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुम्ही ऑनलाइन व्यवहार करत असाल तर तुम्ही लोकांनाही माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे.’ व्हिडिओच्या खाली त्या माणसाचे नाव Nishant Soni असले लिहिले आहे.

त्यानंतर आम्ही निशांत सोनीला फेसबुकवर शोधू लागलो. यादरम्यान आम्हाला निशांत सोनीचे फेसबुक अकाउंट मिळाले. Paytm अॅपद्वारे एका मुलीने ऑनलाइन फसवणूक केल्याचा दावा करत शेअर होत असलेला व्हिडिओही त्याने शेअर केला आहे. निशांत सोनीचे फेसबुक खाते तपासल्यानंतर असे आढळून आले की तो एक अभिनेता आहे आणि NS KI DUNIYA फेसबुक पेजवर व्हिडिओ बनवतो.

व्हायरल व्हिडिओबद्दल अधिक तपशीलांसाठी आम्ही निशांत सोनी यांच्याशी संपर्क साधला, संभाषणादरम्यान त्यांनी आम्हाला सांगितले की “हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे आणि जागरूकतेच्या हेतूने बनवला आहे. मी अशा अनेक घटना ऐकल्या आहेत ज्यात Paytm अॅप आॅनलाईन बनावट अॅपवरून बिल बनवून दुकानदारांची फसवणूक केली जाते आणि म्हणून मी हा जनजागृती व्हिडिओ बनवला आहे.”

Read More: सचिन तेंडूलकरने पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिलेला नाही, चुकीचा दावा व्हायरल

Conclusion

अशाप्रकारे, आमच्या तपासणीत हे स्पष्ट झाले की, ‘Paytm अॅपद्वारे एक मुलगी ऑनलाइन फसवणूक करताना पकडली गेली’ या दाव्यासह शेअर केलेला व्हिडिओ जनजागृतीसाठी बनवला गेला आहे.Paytm अॅप आॅनलाईन फसवणुकीचा प्रत्यक्ष घटनेशी काहीही संबंध नाही.

Result: Misleading

Our Sources

NS KI DUNIYA FB Post

Nishant Soni FB Account

Direct Contact To Nishant Soni

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular