Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact Checkपोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना खरंच अटक केले...

पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना खरंच अटक केले होते? याचे सत्य काय आहे जाणून घ्या

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोत अन्य तिघांसोबत ते खाली बसतांना दिसत आहे. या फोटोसोबत असा दावा केला जातोय की, हा फोटो त्यावेळीचा आहे. जेव्हा भगवंत मान आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पकडले होते. 

ट्विटरचा स्क्रिनशॉट

(या ट्विटची संग्रहित लिंक इथे पाहू शकता)

फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट – Prithvi Raj Singh

व्हायरल फोटोसोबत लिहिले होते,”ओळखा पाहू. हा फोटो तेव्हाचा आहे, जेव्हा या चौघांना दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पंजाब पोलिसांनी पकडले होते ! #panjab_CM”

(मूळ फेसबुक पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)

या अशा पोस्ट लोक फेसबुक आणि ट्विटरवर शेअर करत आहे. त्यावर काही लोकांनी प्रतिक्रिया दिली की, एक दुचाकी चोर सुद्धा मुख्यमंत्री बनू शकतो. भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा दारूच्या सवयीमुळे खूपदा वादात सापडले होते. जानेवारी २०१९ मध्ये मान यांनी आपल्या आईच्या उपस्थितीत दारूला हात न लावण्याची शपथ घेतली होती. आता सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत त्यात म्हटलंय की, भगवंत मान आणि त्यांच्या साथीदारांना दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पकडले आहे.

Fact Check/Verification

व्हायरल फोटोला रिव्हर्स सर्च केले. त्यावेळी आम्हांला करमजीत अनमोल या एका पंजाबी गायक आणि अभिनेत्याची फेसबुक पोस्ट मिळाली. करमजीतने व्हायरल फोटो १८ मार्च रोजी शेअर केली होती. करमजीत यांनी फोटोसोबत लिहिले होते की माझी, भगवंत मान आणि मनजीत सिद्धू यांच्यासोबत होळीच्या आठवणी आहेत.

फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट – Karamjit Anmol

फोटोबाबत अजून माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही करमजीत यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यानंतर आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, मनजीत सिद्धू कोण आहेत. ज्यांना करमजीत यांनी फोटोत टॅग केले होते.

करमजीत यांची प्रोफाईल शोधत असतांना लॅली मनजीत सिद्धू नावाची एक दुसरी फेसबुक प्रोफाईल मिळाली. करमजीत यांनी अन्य काही पोस्टमध्येही मनजीत सिद्धू यांना टॅग केले होते. सिद्धू यांच्या प्रोफाईलवर लिहिले होते की, ते आम आदमी पार्टी पंजाबचे कार्यकर्ता आहे. आम्ही मनजीत यांच्याशी संपर्क केला. त्यांनी आम्हांला सांगितले की, त्या फोटोमध्ये ते स्वतः आहे. भगवंत मान यांच्या शेजारी काळे टी-शर्ट घालून बसले आहे. 

सिद्धू यांच्या म्हणण्यानुसार,”फोटोसोबत केला जाणारा दावा चुकीचा आहे. हा फोटो १९९४ किंवा १९९५ च्या दरम्यान पटियालाचा आहे. त्यावेळी कॅनडियन गायक हरभजन मान भारतात आले होते. त्यांच्याच घरापुढे काढलेला हा फोटो आहे. त्यावेळी भगवंत मान, करमजीत अनमोल आणि हरभजन मान देखील उपस्थित होते. भगवंत मान माझे कॉलेजपासूनचे मित्र आहे.” मनजीत सिद्धू यांनी व्हायरल झालेल्या फोटोचा मूळ फोटो पाठवला. ज्यात अन्य काही व्यक्तीही दिसत आहे. 

मनजीत सिद्धू यांनी पाठवलेला फोटो

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या तपासात स्पष्ट झाले की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि त्यांच्या साथीदारांचा काही वर्षांपूर्वीचा एक जुना फोटो भ्रामक दाव्यासोबत शेअर केला जात आहे. 

Result : False Context / False 

Our Sources

करमजित अनमोल यांची फेसबुक पोस्ट

मनजीत सिद्धू यांच्याशी साधलेला संवाद

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular