Tuesday, September 17, 2024
Tuesday, September 17, 2024

HomeFact Checkपत्रकार रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला? चुकीचा दावा व्हायरल

पत्रकार रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला? चुकीचा दावा व्हायरल

याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख सौरभ पांडे याने लिहिला आहे.

Claim

निर्भीड या डिजिटल वृत्तपत्राने बातमी दिलीये की, अदानी समूहाने एनडीटीव्हीचा हिस्सा विकत घेतल्यावर पत्रकार रवीश कुमार यांनी राजीनामा दिला.

फोटो साभार : Facebook/Nirbhid Wrutta

Fact 

अदानी समूहाने एनडीटीव्हीचे २९.१८ टक्के हिस्से खरेदी केले आहे. त्याचबरोबर समूहाने २६ टक्के हिस्से खरेदी करण्याची खुली ऑफरही जारी केली आहे. अदानी समूहाने एनडीटीव्हीमधील हिस्सा खरेदी केल्यावर राजीनाम्याच्या नावाने शेअर केला जाणाऱ्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही पत्रकार रवीश कुमार यांच्या सोशल मीडियाचे खाते तपासले. तेव्हा आम्हांला २४ ऑगस्ट २०२२ रोजी रवीश कुमार यांचे एक ट्विट मिळाले. त्या ट्विटमध्ये त्यांनी राजीनाम्याची घटना केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे. 

काही युजरने एका खोट्या स्क्रिनशॉटला खरा समजून तो शेअर केला आहे. रवीश कुमार यांचे ट्विटवरील युजरनेम Rubbishkumar नसून ravishndtv असं आहे. 

फोटो साभार : Twitter@kaajukatla

रवीश कुमार यांच्या या ट्विटनंतर काही वृत्त माध्यमांनी देखील ही बातमी अफवा असल्याचे सांगितले आहे. अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, अदानी समूहाने एनडीटीव्हीचा हिस्सा विकत घेतल्यावर पत्रकार रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्याची घटना खोटी आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही एक अफवा असल्याचे सांगितले आहे.

Result : False

जर तुम्हांला माझी तथ्य पडताळणी आवडत असेल तर असेच विविध लेख या दुव्यावर टिचकी मारून तुम्ही वाचू शकता.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular