Authors
(याची मूळ तथ्य पडताळणी न्यूजचेकर इंग्रजीने केली आहे आणि हा लेख Vasudha Beri हिने लिहिला आहे)
सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, तुमच्या घरी कार्यक्रम / पार्टीत भरपूर अन्न वाया जात असेल तर कृपया १०९८ वर कॉल करा, चाईल्ड हेल्पलाईनची माणसे उरलेले अन्न गोळा करून नेतील.
ही पोस्ट फेसबुकवर देखील शेअर होत आहे. त्याचे स्क्रिनशॉट खाली जोडत आहे.
न्यूजचेकरला (+९१-९९९९४९९०४४) या व्हाट्स अॅप नंबरवर असाच एक दावा तथ्य पडताळणीसाठी एका युजरने पाठवला होता.
‘१०९८’ ही चाईल्डलाईन सेवा मुलांच्या मदतीसाठीची आपत्कालीन फोन सेवा आहे. केंद्रीय मंत्रालयाची नोडल एजन्सी आणि चाईल्डलाईन इंडिया फाऊंडेशन यांच्या देखरेखीखाली ही सेवा वर्षाचे १२ ही महिने २४ तास कार्यरत असते.
Fact Check / Verification
१०९८ ही चाईल्डलाईन सेवा उरलेले अन्न गोळा करून त्याचे वितरण करते, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सीआयएफच्या (चाईल्डलाईन इंडिया फाऊंडेशन) अधिकृत संकेतस्थळ काळजीपूर्वक तपासले. पण आम्हांला तिथे या सेवेबद्दल कुठलीही माहिती मिळाली नाही.
त्यानंतर आम्ही गुगलवर ‘१०९८ फूडवेस्ट’ असा कीवर्ड टाकला. त्यावेळी आम्हाला २०१७ आणि २०१८ काही बातम्या आढळल्या. त्यात लिहिले होते की, हा संदेश खोटा आहे. यावरून हे स्पष्ट होते की, हा संदेश जवळपास सहा वर्षांपूर्वीचा आहे.
२०१८ च्या बिझनेस स्टँडर्डच्या बातमीत त्यांनी म्हटलंय,”लहान मुलांसाठी देशव्यापी आपत्कालीन चाईल्डलाईन हेल्पलाईनने एक गोष्टीचे स्पष्टीकरण दिले. ऑनलाईन प्रसारित होणाऱ्या स्पॅम संदेशाप्रमाणे आम्ही कुठलेही उरलेले अन्न गोळा करत नाही.”
यानंतर त्यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सूचना जारी करून म्हणाले,”आम्हांला समजले की, सध्या एक संदेश प्रसारित होतोय. ज्यात म्हटलंय की, कार्यक्रम झाल्यानंतर उरलेले अन्न उचलण्यासाठी १०९८ फोन करा. जेणेकरून अन्न वाया जाणार नाही.”
पुढे बोलतांना म्हणाले,”पण हे खरे नाही. आम्ही भारतातील एकमेव आणि सर्वात व्यापक मुलांच्या १०९८ या आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध आहोत. आम्ही कोणतेही अन्न उचलून त्याचे वितरण करत नाही. कृपया हा संदेश प्रसारित करू नका. तुमचे सहकार्य कौतुकास्पद आहे.”
द न्यूज मिनिटच्या बातमीनुसार, २०१६ मध्ये चाईल्डलाईन यांनी त्यांच्या संकेतस्थळावर असाच इशारा दिला होता.
हा दिशाभूल करणारा संदेश अनेक वर्षांपूर्वी मेलवरून आला. मग त्यानंतर तो सोशल मीडियावरील विविध ठिकाणी पुन्हा दिसू लागला आहे.
या व्यतिरिक्त आम्हांला १७ मे २०२२ रोजी पीआयबी फॅक्ट चेकने केलेले एक ट्विट आढळले. ज्यात त्यांनी हा संदेश बनावट असल्याचे सांगितले आहे. त्यात म्हटलंय,”१०९८ ही चाईल्डलाईन आपत्कालीन फोन सेवा आहे, जी संकटात असलेलया मुलांना मदत करते. पण ते कोणत्याही गरजूंसाठी अन्न वितरित करण्याचे काम करत नाही.”
त्याचबरोबर रिजनल आऊटरिच ब्युरो, उत्तरप्रदेश यांनी देखील त्यांच्या ट्विटमध्ये स्पष्ट सांगितलंय की, १०९८ ही चाईल्डलाईन सेवा गरजूंसाठी कोणतेही अन्न उचलून त्याचे वितरण करत नाही.
न्यूजचेकरने १०९८ या चाईल्डलाईनच्या नंबरवर देखील संपर्क साधला. तेव्हा त्यांनी हा दावा फेटाळला. चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशनचे हेड रिसोर्स मोबिलायझेशन आणि कम्युनिकेशनचे विकास पुथरण यांनी ईमेलद्वारे सांगितले की,”हे खरे नाही. आम्ही उरलेले अन्न उचलून त्याचे वितरण करत नाही. आम्ही संकटात असलेल्या मुलांसाठी आपत्कालीन मदत करण्याचे काम करतो.”
हे देखील वाचू शकता : शरद पवार यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे नेमके सत्य काय आहे?
Conclusion
अशा पद्धतीने चाईल्डलाईन १०९८ हा नंबर कार्यक्रम आणि पार्टीतून उरलेले अन्न गोळा करून त्याचे वितरण करतो, असा दावा केला जाणारा व्हायरल संदेश खोटा आहे. ज्या मुलांना मदतीची गरज आहे, त्यांच्या आपत्कालीन फोन सेवेचा हा नंबर आहे.
Result : Fabricated Content/False
Our Sources
१६ जुलै २०१८ चा बिझनेस स्टँडर्डची बातमी
४ फेब्रुवारी २०१६ ची द न्यूज मिनिटची बातमी
पीआयबी फॅक्ट चेक यांनी केलेले अधिकृत ट्विट
रिजनल आऊटरिच ब्युरो, उत्तरप्रदेश यांनी केलेले अधिकृत ट्विट
१७ मे २०२२ रोजी ई-मेलवरून चाईल्डलाईन इंडिया फाऊंडेशनशी झालेला संवाद
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.