Monday, June 17, 2024
Monday, June 17, 2024

HomeFact CheckFact Check: तरुण सोशल मीडिया युजर्सना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देणार...

Fact Check: तरुण सोशल मीडिया युजर्सना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देणार का? राहुल गांधींच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य येथे जाणून घ्या

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
इंस्टाग्राम आणि फेसबुक चालवणाऱ्या तरुणांना काँग्रेस दरवर्षी एक लाख रुपये देणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
Fact

राहुल गांधींचा क्लिप केलेला व्हिडिओ खोटा दावा करून शेअर केला जात आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधी मंचावरून बोलताना दिसत आहेत कि, ”हमारे जो युवा हैं… जो आज सड़कोंपर घूम रहे हैं… इंस्टाग्राम-फेसबुक देख रहे हैं… उनके बैंक अकाउंट में साल का एक लाख रुपया… 8,500/- रूपए महीने का टकाटक टकाटक टकाटक टकाटक हमारी सरकार डालेगी।”

२२ एप्रिल २०२४ रोजी, X (पूर्वीचे ट्विटर) वर राहुल गांधींचा हा व्हिडिओ शेअर करताना, एका युजरने इंग्रजीमध्ये कॅप्शन लिहिले, ज्याचे मराठी भाषांतर पुढीलप्रमाणे आहे: “सामान्य तरुण जे इंस्टाग्राम आणि फेसबुक 24×7 पाहण्याचे कठीण काम करत आहेत त्यांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला 8500/- रुपये आपोआप जमा होतील…टकाटक…टकाटक. # संपत्ती पुनर्वितरण योजना.” व्हायरल पोस्टचे संग्रहण येथे पहा.

अशा इतर सोशल मीडिया पोस्ट इथे, इथे आणि इथे पाहता येतील.

Fact Check: तरुण सोशल मीडिया युजर्सना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देणार का? राहुल गांधींच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य येथे जाणून घ्या
Courtesy: X/@MeghUpdates
Fact Check: तरुण सोशल मीडिया युजर्सना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देणार का? राहुल गांधींच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य येथे जाणून घ्या
Courtesy: X/@doctorrichabjp

मात्र, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला आढळून आले की, व्हायरल व्हिडिओ क्लिप केलेला आहे. व्हिडिओच्या लांबलचक आवृत्तीमध्ये, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास, राहुल गांधी सार्वजनिक, खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील पदवीधर आणि पदविकाधारक तरुणांना दरमहा रु. ८५००/- मासिक स्टायपेंडसह शिकाऊ प्रशिक्षण देतील असे सांगताना पाहिले जाऊ शकते. या संदर्भात ते पुढे म्हणतात की, ‘हमारे जो युवा आज सड़कों पर घूम रहे हैं, इंस्टाग्राम-फेसबुक देख रहे हैं। उनके बैंक अकाउंट में साल का एक लाख रुपया, ८५००/-रूपए महीने का टकाटक.. हमारी सरकार डालेगी।’

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, प्रथम आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सचा रिव्हर्स इमेज शोध घेतला. परिणामी, आम्हाला २० एप्रिल २०२४ रोजी राहुल गांधींच्या अधिकृत YouTube चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये व्हायरल क्लिप आढळली. बिहारमधील भागलपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घेतलेल्या या व्हिडिओमध्ये व्हायरल क्लिपचा भाग १२:४० ते १२:५६ दरम्यान दिसत आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर, असे समजले आहे की राहुल गांधी पदवीधर आणि डिप्लोमा धारक बेरोजगार तरुणांना एक वर्षासाठी मासिक ८५००/- च्या वेतनासह सार्वजनिक, खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील प्रशिक्षण देण्याचे वचन देत आहेत.

१०:०० मिनिटांच्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी रोजगार मिळवण्यासाठी शिकाऊ उमेदवारीचे महत्त्व सांगताना पुढे म्हणतात की, “श्रीमंतांची मुले शिकाऊ उमेदवारी करू शकतात, पण आमचे बेरोजगार तरुण करू शकत नाहीत.” त्यानंतर ते काँग्रेसच्या “प्रथम रोजगार हमी योजने”बद्दल बोलू लागतात. राहुल गांधी म्हणतात की “या योजनेअंतर्गत आम्ही भारतातील सर्व पदवीधर आणि डिप्लोमा धारकांना शिकाऊ प्रशिक्षणाचा अधिकार देणार आहोत. ज्या अंतर्गत आमचे पुढचे सरकार भारतातील प्रत्येक तरुणाला पहिल्या नोकरीचा अधिकार देणार आहे.”

“पहिली नोकरी हमी योजना” चे स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की “मनरेगाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांप्रमाणेच आमचे सरकार पदवीधर आणि पदविकाधारक तरुणांना पहिल्या नोकरीचा अधिकार देईल. लाभार्थी तरुणांना एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी मिळेल आणि या कालावधीत त्यांच्या बँक खात्यात रु. १,००,०००/- प्रति वर्ष (रु. ८,५००/- दरमहा) जमा केले जातील. आणि जे युवक प्रशिक्षणादरम्यान चांगली कामगिरी करतात ते कायमस्वरूपी नोकरीसाठी पात्र असतील.”

त्याच क्रमाने १२:४० मिनिटांनी ते म्हणतात, ‘आज आमची तरुणाई इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बघत रस्त्यावर फिरत आहे. आमचे सरकार त्यांच्या बँक खात्यात वर्षाला १ लाख रुपये आणि दरमहा रुपये ८,५००/- जमा करेल.

Courtesy: YouTube/Rahul Gandhi

पुढील तपासात, आम्हाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ”पहली नौकरी पक्की योजना” आढळून आली. जाहीरनाम्याच्या पान ११ वर ‘रोजगार’ या शीर्षकाखाली ‘प्रशिक्षणाचा अधिकार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. याअंतर्गत २५ वर्षांखालील पदवीधर आणि पदविकाधारक तरुणांना एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले असून या कालावधीत एक लाख रुपयांची रक्कम दिली जाईल.

Fact Check: तरुण सोशल मीडिया युजर्सना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देणार का? राहुल गांधींच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य येथे जाणून घ्या
Courtesy: Congress Manifesto

Conclusion

आमच्या तपासातून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो की राहुल गांधींचा क्लिप केलेला व्हिडिओ दिशाभूल करीत शेअर केला जात आहे.

Result: Missing Context

Sources
Video on the official You Tube channel of Rahul Gandhi shared on 20th April 2024.
Congress Manifesto

(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी कोमल सिंग यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular