Saturday, December 21, 2024
Saturday, December 21, 2024

HomeFact Checkमोरबीमध्ये मदतकार्यासाठी नदीत उतरलेली ही व्यक्ती काँग्रेस आमदार नाही

मोरबीमध्ये मदतकार्यासाठी नदीत उतरलेली ही व्यक्ती काँग्रेस आमदार नाही

(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदी साठी अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)

गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्यूबच्या मदतीने पाण्यात तरंगताना दिसत आहे.ही व्यक्ती मोरबी येथील काँग्रेस आमदार ब्रिजेश मेरजा असल्याचा आणि अपघातानंतर गुडघाभर पाण्यात पोहून मदतकार्य करण्याची नौटंकी करीत असल्याचा दावा केला जात आहे.

Courtesy:Facebok/jitendrakumar.singh.9406

हा व्हिडिओ शेअर करत फेसबुक आणि ट्विटर युजर्स कॅप्शनमध्ये लिहित आहेत,“मोरबीच्या काँग्रेस आमदार ब्रिजेश मेर्जाने नौटंकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या,अपघातानंतर, मदतकार्य करण्यासाठी गुडघाभर पाण्यात पोहत.बर्बाद गुलिस्ताँ करने को बस एक ही उल्लू काफ़ी था हर शाख़ पे उल्लू बैठा है अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा…!!”.

Fact Check/Verification

काही कीवर्डच्या मदतीने व्हायरल व्हिडिओ शोधल्यावर,आम्हाला TV9 भारतवर्षचा रिपोर्ट सापडला.या रिपोर्टमध्ये एक व्हायरल व्हिडिओ असून त्यात सांगण्यात आले आहे की,ट्यूब घालून पाण्यात उतरलेली ही व्यक्ती मोरबीचे भाजपचे माजी आमदार कांतीलाल अमृतिया आहेत.

अपघाताच्या वेळी कांतीलाल घटनास्थळी उपस्थित होते,असे वृत्तात लिहिले आहे.पूल कोसळल्यानंतर काही वेळातच ते इतरांसह मदतकार्यात सहभागी झाले.त्यांच्या कामाचे कौतुकही झाले.

कांतीलाल यांच्या या मदत कार्याबाबत इतर ठिकाणी बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.अपघाताच्या दिवशीचा व्हायरल व्हिडीओ त्यानी स्वत:च्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता.

कोण आहे ब्रिजेश मेरजा?

ब्रिजेश मेरजा हे गुजरातच्या भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत.मेरजा 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर मोरबीचे आमदार झाले.त्यांनी भाजपच्या कांतीलाल अमृतिया यांचा पराभव केला.पण 2020 मध्ये मेर्जा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणूक जिंकून पुन्हा मोरबीचे आमदार झाले.

Conclusion

आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडीओबाबत करण्यात आलेला दावा खोटा आहे.मोरबीतील मदतकार्याचा हा व्हिडीओ कोणत्याही काँग्रेस आमदाराचा नसून मोरबीतील भाजपच्या एका माजी आमदाराचा आहे.

Result:False

Our Sources
Report of TV9 Bharatvarsh, published on October 31, 2022

Tweet of Kantilal Amrutiya, posted on October 30, 2022

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी,दुरुस्तीसाठी किंवा इतर सूचनांसाठी,आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा:checkthis@newschecker.in

Most Popular