Monday, November 25, 2024
Monday, November 25, 2024

HomeFact Check‘वयाच्या 84 व्या वर्षी सुमन कल्याणपूर गाताना’ चा व्हायरल व्हिडिओ खोटा आहे

‘वयाच्या 84 व्या वर्षी सुमन कल्याणपूर गाताना’ चा व्हायरल व्हिडिओ खोटा आहे

(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजी साठी सर्वप्रथम वैभव भुजंग यांनी केले आहे.)

एका वृद्ध महिलेचा गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर वयाच्या 84 व्या वर्षी गात असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये एका वृद्ध गृहस्थासोबत एक वृद्ध महिला युगलगीत गाताना दिसत आहे. 1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पतिता’ चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायिलेले गाणे या व्हिडिओमध्ये आहे.

‘सुमन कल्याणपूर वयाच्या 84 व्या वर्षी गाणे गातेय’ अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.

Newschecker ला Facebook वर समान मथळ्यांसह समान दावे आढळले.

सुमन कल्याणपूर यांची कारकीर्द

सुमन कल्याणपूर यांनी आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे आणि ना ना करते प्यार तुम्हीं से कर बैठे यांसारखी गाणी गायली आहेत.सुमन कल्याणपूर यांची कारकीर्द 1954 मध्ये सुरू झाली आणि 1960 आणि 1970 च्या दशकात त्या खूप लोकप्रिय गायिका होत्या. त्यांनी हिंदी, मराठी, आसामी या व्यतिरिक्त अनेक भाषांमधील चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली आणि 3 वेळा हिंदी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट शास्त्रीय गाण्यासाठी “सूर शृंगार संसद” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 6 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर, सुमन कल्याणपूर यांनी एक मुलाखत दिली होती की त्यांचा आवाज लता मंगेशकर यांच्यासारखाच होता गायन क्षेत्रातील तज्ज्ञच त्यातील वेगळेपण सांगू शकतो.

Fact Check/ Verification

न्यूजचेकरने व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्याच्या मुख्य फ्रेम्सवर Google रिव्हर्स इमेज शोध घेतला आणि 2 ऑक्टोबर 2021 रोजी अंबागोपाल फाउंडेशनच्या फेसबुक पेजद्वारे अपलोड केलेल्या व्हायरल व्हिडिओमधील काही प्रतिमांशी जुळणारा व्हिडिओ सापडला.

कीवर्ड शोधल्यानंतर, न्यूजचेकरला अंबागोपाल फाऊंडेशनची वेबसाइट सापडली ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये असणाऱ्या महिलेच्या प्रतिमा होत्या. अंबागोपाल फाऊंडेशन ही टाटा मेमोरियल सेंटर द्वारे समर्थित धर्मादाय संस्था आहे. त्यांचा पुढाकार HOSH (Helping Our Society Heal), अंबागोपाल फाऊंडेशन सेंद्रिय शेतकऱ्यांना समर्थन, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि स्वच्छ अन्न आणि वृद्धांची काळजी यासाठी मोहीम राबविली जाते.

त्यांच्या वेबसाइटनुसार, ज्या कार्यक्रमात हे गाणे सादर केले गेले तो 2018 मधील आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनासाठी आयोजित करण्यात आला होता. वेबसाइटवर व्हायरल व्हिडिओत असलेल्या महिलेच्या अनेक प्रतिमा पाहायला मिळतात.

वयाच्या ८४ व्या वर्षी सुमन कल्याणपूर गाताना
Screengrab Of Ambagopal Foundation Website
Screengrab Of Ambagopal Foundation Website

न्यूजचेकरने चित्रांवर Google रिव्हर्स इमेज सर्च केले आणि टाइम्स ऑफ इंडियाने 4 मे 2020 रोजी अपलोड केलेला एक लेख सापडला. लेखानुसार, महिलेची ओळख अरुणा प्रकाश अशी आहे, त्या 78 वर्षांच्या असून ती जुहू येथे राहतात. स्वयंसेवकांपैकी एक असून त्या डॉक्टर आणि वृद्धांना मदत करण्याच्या उद्देशाने नवीन हेल्पलाइनमध्ये कोविड बाधित रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी काम करतात.

Screengrab of TOI

न्यूजचेकरला आढळले की लेखातील प्रतिमा व्हायरल व्हिडिओमधील चित्राशी जुळते.

न्यूजचेकरने अंबागोपाल फाऊंडेशनशीही संपर्क साधला त्यांनी हा व्हिडिओ ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमातील असल्याची पुष्टी केली. त्यांनी असेही सांगितले की ही महिला लोकप्रिय गाण्यावर लिप-सिंक करत होती आणि व्हायरल दाव्यात नमूद केल्याप्रमाणे ती खरोखर गात नव्हती.

Conclusion

न्यूजचेकरने केलेल्या तपासणीनुसार, अरुणा प्रकाश एका लोकप्रिय गाण्यावर लिप सिंक करत असल्याचा व्हिडिओ, सुमन कल्याणपूर या वयाच्या ८४ व्या वर्षी गात असल्याचे सांगून प्रसारित केला जात आहे.

Result: False

तुम्‍हाला एकाद्या क्‍लेमची फॅक्ट-तपासणी करायची असेल, फीडबॅक द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर 9999499044 वर व्हॉट्सअप करा किंवा checkthis@newschecker.in वर ईमेल करा.

Most Popular