Saturday, June 22, 2024
Saturday, June 22, 2024

HomeFact Checkपंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपूर्ण व्हिडिओ भ्रामक दाव्यासह...

पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपूर्ण व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम शुभम सिंग यांनी केले आहे.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नागपुरात वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. आता याच कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पीएम मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. एकनाथ शिंदे कॅमेऱ्यासमोर आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मागे ढकलल्याचा दावा करीत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Courtesy: Twitter@RashtraManch
Courtesy: Facebook/Satyanarayan Patel

गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पीआयबीच्या अहवालानुसार, नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा 8,650 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधानांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. दरम्यान, नागपूर मेट्रोच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींनी एकनाथ शिंदे यांना मागे ढकलल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

Fact Check/ Verification

दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. आम्हाला व्हिडिओमध्ये ‘ABP Manjha’ चा लोगो दिसला. आम्ही ABP च्या YouTube चॅनलवर व्हिडिओ गुगल केला. आम्हाला 12 डिसेंबर 2022 रोजी या चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ सापडला.

Courtesy: Twitter@RashtraManch

व्हिडिओनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यामध्ये व्हायरल व्हिडिओचे मोठे व्हर्जन पाहता येते.

ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पीएम मोदी हात हलविताना आणि नंतर वळून एकनाथ शिंदे यांच्याशी हस्तांदोलन करतात, हे व्हिडिओ पाहून स्पष्ट होते. त्यानंतर, दुसऱ्या दिशेने पाहत ते हात हलवतात. यावेळी मोदींच्या शेजारी एकनाथ शिंदे उभे आहेत. तपासादरम्यान नरेंद्र मोदींचे यूट्यूब चॅनलही आम्ही शोधले. 12 डिसेंबर 2022 रोजी नागपूर मेट्रोच्या उद्घाटन समारंभाचा व्हिडिओ तेथेही अपलोड करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर पीएम मोदी हात हलवीत असल्याचे या व्हिडिओमध्येही स्पष्ट दिसत आहे. पंतप्रधानांनी एकनाथ शिंदे यांना ढकलल्याचे कुठेही दिसत नाही.

Conclusion

आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपूर्ण व्हिडिओ भ्रामक दावा करून शेअर केला जात आहे.

Result: Missing Context

Our Sources

Report Published by ABP Manjha

Narendra Modi YouTube Channel

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular