Authors
रिझर्व्ह बँक १ जानेवारीला २००० रुपयांच्या नोटा बंद करेल आणि त्याच दिवशी १००० रुपयांच्या नोटा जारी करेल, असा दावा करणारा एक मेसेज सध्या व्हॉट्सअपवर फिरत आहे.
“RBI कडून १ जानेवारीपासून १००० च्या नव्या नोटा जारी केल्या जातील. २००० च्या नोटाही त्याच दिवशी बंद केल्या जातील. २००० च्या बंद केलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी फक्त ५०००० रुपयांपर्यंतचा मर्यादा असेल. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्या त्यावेळी झाल्याप्रमाणे जर आपल्याला त्रास करून घ्यायचा नसेल तर लवकरात लवकर २००० च्या नोटा बदलून घ्या.” असे सांगणारा संदेशही विविध भाषेत फिरू लागला आहे.
प्रदीप कुमार एनके या आयडीच्या याच विषयावरील मल्याळी भाषेतील रीलला अनेक युजर्सची प्रतिसाद मिळत असून अनेकांनी ती रील शेयर देखील केली आहे.
भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी अलीकडेच संसदेत सरकारला टप्प्याटप्प्याने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची मागणी केली. राज्यसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी अमेरिका, चीन आणि जर्मनीसारख्या विकसित अर्थव्यवस्थांचे उदाहरण दिले, ज्यांच्याकडे १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा नाहीत.
Fact Check/ Verification
सरकारी नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी सल्लामसलत करून छापल्या जातात. अशा प्रकरणांमध्ये RBI च्या अधिकृत अधिसूचना त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केल्या जातील. परंतु RBI चलनात असलेल्या २००० रुपयांच्या नोटा काढून घेईल आणि त्याच दिवशी १००० रुपयांच्या नोटा जारी करेल अशी कोणतीही सूचना आम्हाला वेबसाइटवर आढळली नाही.
कीवर्ड वापरून केलेल्या तपासणीतून असे दिसून आले की प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो फॅक्ट चेक (पीआयबी) ने १६ डिसेंबर २०२२ रोजी असे ट्विट केले होते की, २००० च्या नोटासंदर्भात सुरु असलेला असा प्रचार खोटा आहे.
१९ सप्टेंबर, २०२० रोजी लोकसभेत त्यांच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले: “२०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षांसाठी २००० रुपयांच्या नोटा छापण्यासाठी प्रेसना इंडेंट केले गेले नाही. मात्र, २००० रुपयांची छपाई थांबवण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.”
“३१ मार्च २०२० पर्यंत, २७,३९८ लाख रुपयांच्या २००० च्या नोटा चलनात होत्या, ३१ मार्च २०१९ पर्यंत ३२,९१० लाख नोटा चलनात होत्या,” असे मंत्री म्हणाले. “कोविड-१९ साथीच्या आजारामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने नोटांची छपाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. “तथापि, केंद्र/राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार छपाई टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्यात आली आहे,” ते पुढे म्हणाले.
अनुराग ठाकूर यांचे उत्तर त्या दिवशी विविध माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. तुम्ही ते इथे, इथे आणि इथे वाचू शकता.
Conclusion
आमचे संशोधन असे दर्शविते की RBI १ जानेवारी रोजी रु. २००० च्या नोटा काढून घेईल आणि त्याच दिवशी रु. १००० च्या नोटा जारी करेल या प्रचाराचे समर्थन करण्यासाठी RBI द्वारे कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे.
Result: False
Sources
Press Information Bureau Fact Check on December 16,2022
Minister of State for Finance, Anurag Thakur’s
written reply in Lok Sabha on September 19,2020
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in