जर्मनीत तीन डोळे असलेले बाळ जन्मल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात बाळाचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत बाळाच्या दोन भुवयांच्या मध्ये कपाळावर तिसरा डोळा असल्याचे दिसत आहे. तिन्ही डोळ्यांच्या बुबळांची हालाचाल देखील एकसमान होताना या व्हिडिओत दिसते.

पडताळणी
आम्ही या संदर्भात शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, फेसबुकवर याच दाव्याच्या काही पोस्ट आढळून आल्या.

याशिवाय ट्विटर आणि यूट्यूबवर देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याचे आढळून आले
आम्ही मुख्य प्रवाहातील माध्यमांत यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अशी कोणतीही अधिकृत बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही हा व्हिडिओ बारकाईने पाहिला असता हा व्हिडिओ विशिष्ट साॅफ्टवेअरच्या साहाय्याने एडिट केल्याचे आढळून आले कारण बाळाच्या तिस-या डोळ्यांची हालचाल ही डाव्या डोळ्यासारखीच होताना दिसत आहेत. यावरुन हे स्पष्ट दिसते की डाव्या डोळ्याचा स्क्रिनशाॅट साॅफ्टवेअरच्या साहाय्याने एडिट करुन कपाळावार लावण्यात येऊन हा तिसरा डोळा असल्याचे भासवण्यात आले आहे.

यानंतर आम्ही तीन डोळ्यांचे बाळ जन्मू शकते का यासदंर्भात गूगलवर शोध सुरु केला असता नॅशनल इंस्टिट्यूट आॅफ हेल्थच्या वेबसाईटवरील वैद्यकीय जर्नलमध्ये या रोगास कार्निव्होरेसीस असे म्हणतात ही माहिती मिळाली.

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओतील लहान बाळाचा व्हिडिओ हा विशिष्ट ग्राफिक्स साॅफ्टवेअरच्या साहाय्याने तयार करण्यात आला आहे.
Source
- Youtube
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)