Saturday, December 21, 2024
Saturday, December 21, 2024

HomeFact CheckFact Check: वाराणसीमध्ये होळीच्या दिवशी परदेशी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हायरल होणारा व्हिडिओ...

Fact Check: वाराणसीमध्ये होळीच्या दिवशी परदेशी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हायरल होणारा व्हिडिओ आहे ३ वर्षे जुना

Claim
वाराणसीत होळीच्या दिवशी परदेशी महिलेसोबत गैरवर्तन.

Fact
ज्या व्हिडिओसह हा दावा केला जात आहे तो ३ वर्षे जुना आहे, अलीकडील नाही.

वाराणसीमध्ये होळीच्या दिवशी काही मुलांनी एका परदेशी महिलेशी गैरवर्तन आणि लैंगिक अत्याचार केल्याचा दावा करीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावरील काही मुले मुलीला घेरून तिच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसत आहेत. नंतर ती मुलगी सांगत आहे की तिचा विनयभंग आणि अनुचित ठिकाणी स्पर्श कसा झाला.

Fact Check: वाराणसीमध्ये होळीच्या दिवशी परदेशी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हायरल होणारा व्हिडिओ आहे ३ वर्षे जुना
Courtesy: Twitter@ajaychauhan41

अनेक सोशल मीडिया युजर्सनी हा व्हिडिओ शेअर करून संताप व्यक्त केला आहे. पत्रकार विनोद कापरी (Vinod Kapri) यांनी व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले की, “होळीच्या नावाने किती लाजिरवाणा आणि घृणास्पद गोंधळ आहे – या परदेशी महिलेचा अनुभव ऐका.”

Fact Check/ Verification

विनोद कापरी यांच्या ट्विटवर अनेकांनी हा व्हिडिओ जुना असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच एक YouTube लिंक देखील शेअर केली आहे जी “अंडर द सेम स्काय” नावाच्या YouTube चॅनेलची आहे.

या चॅनेलवर 13 सप्टेंबर 2020 रोजी व्हायरल व्हिडिओची मोठी आवृत्ती अपलोड करण्यात आली होती. या YouTube व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओचा भाग 2.49 मिनिटांनंतर पाहता येईल. हे यूट्यूब चॅनल ‘Skye’ नावाच्या परदेशी महिलेचे आहे.

वाराणसीत होळीच्या दिवशी परदेशी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल

Fact Check: वाराणसीमध्ये होळीच्या दिवशी परदेशी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हायरल होणारा व्हिडिओ आहे ३ वर्षे जुना
Conclusion: YouTube

या व्हिडिओच्या माध्यमातून महिलेने वाराणसीमध्ये होळीच्या दिवशी आपल्यावर कसे लैंगिक अत्याचार झाले हे सांगितले. या महिलेने एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यावेळी ही महिला वाराणसीमध्ये होळी साजरी करण्यासाठी आली होती. यूट्यूब चॅनलवर दिलेल्या माहितीनुसार, ही महिला एकल प्रवासी असून ती युनायटेड किंगडमची रहिवासी आहे.

होळीच्या दिवशी परदेशी महिलेसोबत विनयभंग झाल्याचे सांगून आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये दिल्लीत होळीच्या दिवशी एका जपानी मुलीशी गैरवर्तन केल्याचा दावा केला जात आहे. आता हा व्हिडिओ जुना आहे की अलीकडचा आहे, हे तपासले जात आहे. याबाबत अधिक माहिती मिळाल्यास बातमीमध्ये अपडेट करण्यात येईल.

Conclusion

एकंदरीत परदेशी तरुणीचा विनयभंग केल्याचे सांगून व्हायरल होणारा हा व्हिडिओ यंदाच्या होळीचा नसून तीन वर्षे जुना असल्याचा निष्कर्ष आमच्या तपासात निघाला आहे.

Result: Missing Context

Our Sources


Video of YouTube Channel “Under The Same Sky”, uploaded on September 13, 2020


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular